Sharda Sinha SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sharda Sinha : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sharda Sinha Passes Away: बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले आहे. यांनी आपल्या गोड आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे.

Shreya Maskar

बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha) यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शारदा यांची गेल्या अनेक दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. त्या आजारी होत्या. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्या दाखल होत्या. वयाच्या ७२ व्या वर्षी बिहारच्या गायिकेने शेवटचा श्वास घेतला.

गायिका शारदा सिन्हा यांचे निधनं झाल्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. शारदा सिन्हा यांना सोमवारी सायंकाळी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गायिका मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन या अवस्थेत होत्या. छठपूजेच्या पहिल्याच दिवशीच शारदा सिन्हा यांनी जगाचा निरोप घेतला. गायिका शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा सिन्हा यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच शारदा सिन्हा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शोक व्यक्त करत ते म्हणाले की," प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या निधनाने संगीत जगताची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत."

बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५२ रोजी हुलसा या गावात झाला. बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांना २०१८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या गाण्यांना लोकांनी भरपूर प्रेम दिले. त्यांची छठची गाणी खूप प्रसिद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT