Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Sangram Chougule: 'छत्रपती शिवाजी महाराज की...' बिग बॉसच्या घरात 'रांगड्या गडी'ची एन्ट्री; कोण आहे सग्रांम चौगुले?

Bigg Boss House Wild Card Entry: .आजच्या एपिसोडमध्ये संग्राम बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. संग्राम बिग बॉसच्या घरात आल्याने नेमकं काय बदल होईल? हे पाहणं आजच्या एपिसोडमध्ये उत्सुक्याचं असेल.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा सातवा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नेमके काय होणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान आगामी एपिसोडमध्ये नवीन स्पर्धकांची एन्ट्री होणार आहे. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

'मिस्टर इंडिया' संग्राम चौगुले याची बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. नुकत्याच रविवारी पार पडलेल्या भाऊचा धक्का या कार्यक्रमात रितेश देशमुखने संग्राम चौगुले स्वागत केले.आजच्या एपिसोडमध्ये संग्राम बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. संग्राम बिग बॉसच्या घरात आल्याने नेमकं काय बदल होईल? हे पाहणं आजच्या एपिसोडमध्ये उत्सुक्याचं असेल.

कोण आहे संग्राम चौगुले? संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापुरचा आहे. धिप्पाड शरीरयष्टी असलेला संग्राम बॉडीबिल्डर आहे. 'फिटनेस फ्रिक' संग्राम २०१४ मिस्टर वर्ल्ड आहे. सहा वेळा 'मिस्टर इंडिया' आणि पाच वेळा 'मिस्टर महाराष्ट्र' ही पदे भूषवली आहेत. छोट्या पडद्यावर संग्राम 'दंभ' या मालिकेतून झळकला आहे. यानंतर त्याने 'आला माझ्या राशीला'मध्ये पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली होती.

सोशल मीडियावर संग्राचे फिटनेस व्हिडीओ पोस्ट करत असतो. संग्रामचा मोठा चाहतावर्ग आहे. मिलियनच्या घरात त्याची फॅनफॉलोविंग आहे. संग्रामने सोशल मीडियावर संग्रामने पोस्ट केली आहे. आता पर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये तुम्ही माझी शारीरिक क्षमता आणि शारीरिक खेळ बघितला आहातच... फक्त शरीरसोष्टि सोडलं तर मी अजून बरच काही करू शकतो... माझी बुद्धिमता तसेच माझ्या बद्दलच्या सर्व गोष्टी अजून जवळून पाहायला तुम्हाला मिळणार आहेत! तर तयार रहा संग्रामच्या नवीन प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी... BIG BOSS MARATHI च्या माध्यमातून आता रोज भेट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT