Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: सूरज चव्हाणच्या नव्या घराचं भूमिपूजन, सोहळ्याच्या Video आला समोर

Suraj Chavan Video: सोशल मीडियावर सूरजच्या नवीन घराच्या भूमिपूजन सोहळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. सूरज सर्वांचीच मने जिंकत हे यश संपादन केलं आहे. गरीबीच्या झळा सोसलेला सूरज त्याची स्वप्न पूर्ण करत आहे. बिग बॉसच्या नावाने स्वताच हक्काचं घर बांधणार असं म्हटलं होता. सोशल मीडियावर सूरजच्या नवीन घराच्या भूमिपूजन सोहळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. सूरजच्या गावी त्याचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. बिग बॉस विजयी सूरजची भेट दिग्गज मंडळीनी घेतली. याचदरम्यान अजित पवार यांनी देखील सूरजला भेटण्यासाठी बोलावलं होतं. याचदरम्यान त्यांनी सूरजचे कौतुक करत लवकरच तुझं घराचं स्वप्न पूर्ण होणार असे म्हटलं होतं. आता गुलिगत सूरजच्या घराचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. नुकताच सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

“घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी ( अजित पवार ) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. दादांनी मला दसऱ्याला घराबद्दल सांगितलं होतं आणि आज मी माझ्या हस्ते भूमिपूजन केलं. खूप बरं वाटतंय. दादांनी गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” सोशल मीडियावर सूरजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलिकडेच सूरज राजाराणी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranji Trophy: BCCI चा ढिसाळ कारभार! खेळपट्टी सुकवण्यासाठी करावा लागतोय देसी जुगाड - Photo

Nashik News : नाशिक मध्यच्या जागेवरून अजूनही संभ्रम; उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता

Imtiaz Jaleel : विजय आमचाच, राजकारणात थोडा सस्पेन्स ठेवावा लागतो; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान

Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

Gulab Jamun : ही रेसिपी फॉलो कराल तर फक्त १० मिनिटांत गुलाब जामून तयार होतील

SCROLL FOR NEXT