Bigg Boss 16  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: प्रियांका-अंकितमध्ये काय शिजतंय, शिव ठाकरेचा डाव कोणावर उलटणार?

शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी 'बिग बॉस'च्या घरात एकेमकांना देणार तगडी टक्कर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बिग बॉस' हिंदीच्या घरात स्पर्धकांमध्ये वादविवाद सुरूच आहेत. शोमध्ये पुढे जाण्यासाठी प्रत्येक स्पर्धक साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंब करताना दिसतो. शिव ठाकरे घराचा मास्टरमाइंड असल्याचे दिसत आहे. शिव प्रत्येक कामात चाणक्याप्रमाणे डोके लावून सर्वांचा खेळ फिरवतो. प्रियंका चौधरीला शिवचा हा डाव समजला आहे आणि ती त्याचा खेळ उलटवण्याचा विचार करत आहे.

प्रियंका चौधरी आणि शिव ठाकरे हे दोघेही 'बिग बॉस 16'चे प्रबळ स्पर्धक मानले जातात. दोन्ही स्पर्धक वेळोवेळी ही गोष्ट सिद्ध करतात. साजिद खान, एमसी स्टॅन आणि अब्दु रोजिक यांच्यासाठी रेलचे काम होते. पण काम शिवाच्या म्हणण्यानुसार झाले. शिवने जसे सांगितले तसे साजिद, अब्दू आणि एमसी स्टॅन यांनी केले.

प्रियांकाला शिवाची युक्ती समजली आणि ती ही गोष्ट अंकित गुप्तासोबत शेअर करताना दिसली. प्रियांका अंकितशी शिवाबद्दल बोलताना म्हणते, हा त्याचा संपूर्ण खेळ आहे. सुरूवातीला सगळे एकत्र असतात. नंतर प्रत्येकजण आपलेच करतो. (Bigg Boss)

प्रियांकाने अंकितला आता शिवाच्या टीममध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा आपल्यावर विश्वास बसेपर्यंत त्यांच्यासोबत राहूया नंतर त्यांचा डाव त्यांच्यावर उलटुया, असेही प्रियांका म्हणाली. प्रोमो पाहून लक्षात येते की, प्रियांकाला खात्री आहे ती शिवाचा प्लॅन फ्लॉप करेल. पण प्रत्यक्षात तसे होणार नाही. ते आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच.

शोमध्ये शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. शिवाचा खेळ समजल्यानंतर आता प्रियांकाने त्याला हरवण्याची योजना आखली आहे. पण ती तिच्या उद्देशात यशस्वी होईल असे वाटत नाही.

शिव अब्दू, साजिद खान, एमसी स्टॅन आणि गोरी नागोरी यांची एक टीम आहे. त्यांना त्यांच्या टीम शिवाय इतर कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे प्रियांकाच्या सांगण्यावरून अंकित शिवच्या टीममध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करू शकतो. पण या प्रयत्नात तो यशस्वी होईल, याची शक्यता फारच कमी आहे.

शिव ठाकरे नेहमीच प्रेक्षकांच्या अपेक्षेपलीकडे काम करताना दिसतो. तुम्ही बुधवारचा एपिसोड पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. जेव्हा अर्चना म्हणाली होती की सुंबुल आल्यावर शिव बेल वाजवणार नाही. पण शिवाने घंटा वाजवून सगळ्यांना दाखवून दिले की तुम्ही जो विचार करताय त्याच्या खूप पुढचा विचार तो करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT