Shah Rukh Khan's Don 3 : शाहरुखच्या 'डॉन'ला 16 वर्ष पूर्ण, 'डॉन 3'ची इच्छा होणार का पूर्ण?

फरहान अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट करता साजरा केले 'डॉन'चा 16 वा वाढदिव
Shah Rukh Khan 'Don 3'
Shah Rukh Khan 'Don 3' Saam Tv

मुंबई: 'डॉन' या चित्रपटाला आज 16 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिग्दर्शक फरहान अख्तरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. फरहानने पोस्ट शेअर करताच नेटिझन्सनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्नांची सरबत्ती केली. प्रत्येकजण फरहानला 'डॉन 3'बद्दल विचारत आहे.

चाहते 'डॉन 3'ची खूप दिवसांपासून वाट पाहता आहेत. या चित्रपटाशी संबंधित अफवाही वेळोवेळी येत असतात. मात्र, 'डॉन 3' बद्दल फरहान अख्तरने कोणतीही माहिती दिलेली नाही. आता जेव्हा त्याने 'डॉन'ला 16 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली तेव्हा चाहत्यांनी त्याला पुन्हा प्रश्न केला.

Shah Rukh Khan 'Don 3'
Anushka Sharma: अनुष्काचे चित्रपटसृष्टीत पदार्पण, आगामी चित्रपटातील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने चित्रपटातील शाहरुख खानची एक क्लिप शेअर केली आहे. 'डॉनच्या शत्रूची सर्वात मोठी चूक म्हणजे तो डॉनचा शत्रू आहे' असे म्हणताना शाहरुख दिसत आहे.

पोस्ट शेअर करत फरहानने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे डॉन, 16 वर्षे पूर्ण झाली आणि प्रवास अजूनही सुरू आहे...'. यासह, त्याने बरेच इमोजी पोस्ट केले आहेत.

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डॉन' 2006 साली प्रदर्शित झाला होता. 2011 मध्ये त्याचा दुसरा भाग 'डॉन 2' प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. दोन्ही चित्रपटांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.

प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून 'डॉन 3'ची वाट पाहत आहेत. पण, फरहान अख्तरने ज्या पद्धतीने या प्रोजेक्टबद्दल मौन बाळगले आहे, त्यावरून असे दिसते आहे की, त्याचा 'डॉन 3' बनवण्याचा अजून विचार नाही. मात्र, सोशल मीडियावर (Social Media) फरहानला अनेकदा विचारले जाते की तो 'डॉन 3'ची घोषणा कधी करणार? आता असे पुन्हा एकदा यूजर्स विचारताना दिसत आहेत. (Movie)

फरहानच्या पोस्टला युजर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एका युजरने लिहिले की, 'डॉन 3 ची घोषणा न करता कसे सेलिब्रेशन कसे होणार'. आणखी एका यूजरने लिहिले की, 'आम्हाला 'डॉन 3' हवा आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'आम्हाला वाटले की ही सर्व माहिती 'डॉन 3' च्या घोषणेची आहे, परंतु जेव्हा आम्ही खरे पाहिले तेव्हा काहीतरी वेगळेच समोर आले.' तर काही यूजर्सनी लिहिले की, 'आम्ही डॉन 3 ची वाट पाहत आहोत, त्याची घोषणा अपेक्षित आहे.'

फरहान अख्तरच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अशा अनेक कमेंट्स येत आहेत. फरहान प्रेक्षकांच्या अपेक्षा कधी पूर्ण करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com