Anushka Sharma: अनुष्काचे चित्रपटसृष्टीत पदार्पण, आगामी चित्रपटातील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

अनुष्का शर्मा सध्या झुलून गोस्वामीचा आगामी बायोपिक चित्रपट 'छकडा एक्सप्रेस' मुळे चर्चेत आहे.
Anushka Sharma Latest Movie Look
Anushka Sharma Latest Movie Look Saam Tv

मुंबई: अनुष्का नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अनेक दिवस अनुष्का चित्रपटसृष्टीपासून दुर होती. झिरो चित्रपटातून अनुष्का प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Anushka Sharma Latest Movie Look
Netflix Top 10 Movies: सिनेमागृहात नाही, ओटीटी वर 'लाल सिंग चड्ढा'ने मारली बाजी

अनुष्का शर्मा सध्या झुलून गोस्वामीचा आगामी बायोपिक चित्रपट 'छकडा एक्सप्रेस' मुळे चर्चेत आहे. अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरून समोर आलेल्या तिच्या लूकने चाहत्यांना केवळ आश्चर्यचकित केले नाही तर त्यांना प्रोत्साहित केले आहे. झुलन गोस्वामीच्या जीवनावर निर्मित होत असलेल्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची व्यक्तिरेखा पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. अनुष्काचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. (Marathi Entertainment News)

Anushka Latest Photo
Anushka Latest Photo Saam Tv

भारतीय महिला क्रिकेट टीममधील माजी वेगवान गोलंदाज झुलून गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) कारकिर्दिला अलविदा केले आहे (Bollywood Actress). तिच्या संघर्षाची कहाणी लोकांनी वाचली तर ती अनेकवेळा घडेल पण, कदाचित पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळणार आहे. सध्या अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ईडन गार्डनमध्ये छकडा एक्सप्रेसच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. झूलन गोस्वामीच्या लूकमधील अनुष्काच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

Anushka Sharma Latest Photo
Anushka Sharma Latest Photo Saam TV

झुलन गोस्वामीच्या भूमिकेत अनुष्का शर्मा

चित्रपटात अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीच्या खऱ्या आयुष्यातील संघर्षांचा सामना करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, अनुष्का क्रिकेट जर्सी आणि पांढरे स्पोर्ट्स शूज घालून बॅट घेऊन मैदानात खेळताना दिसत आहे. अनुष्काचा रफ अँड टफ लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Anushka Sharma Latest Movie Look
Palyad Trailer: सगळ्यांच्या 'पल्याड' जाणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहुन तुम्ही म्हणाल...

झुलन गोस्वामी महिला क्रिकेटपटूंसाठी आदर्श

झुलन गोस्वामी आपल्या ध्येयात एक यशस्वी तरुणी म्हणून ओळखली जात आहे. तिने भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. यासोबतच तिच्याकडे देशातील महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंप्रमाणे पाहिले जाते. 2018 मध्ये, तिच्या सन्मानार्थ भारतीय टपाल तिकीट जारी करण्यात आले होते. प्रोसित रॉयसारख्या दिग्दर्शकांनी झुलनवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातून अनुष्का चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अनुष्काचा शेवटचा चित्रपट झिरो होता, ज्यामध्ये तिने शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर केली होती.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com