Bigg Boss OTT 3 Not Happening This Year Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 यंदा होणार नाही, निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Bigg Boss OTT 3 Latest News: बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द करण्यात आले आहे.

Chetan Bodke

Bigg Boss OTT 3 Not Happening This Year

लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त टिव्ही शो म्हणजे, ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’ शो कायमच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतो. काही वर्षांपासून ‘बिग बॉस ओटीटी’देखील सुरू झाले आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्पर्धकांची यादीही जाहीर झालेली होती. पण, अशातच ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आले आहे. पण अद्याप निर्मत्यांकडून याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. स्पर्धकांची यादीही समोर आलेली होती. यामध्ये दलजीत कौर, जास्मीन कौर, शेहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, महेश केशवाला, रोहित झिंझुरके, विकी जैन, शिझान खान या स्पर्धकांच्या नावाची चर्चा होती. त्या सोबतच ‘बिग बॉस ओटीटी ३’ हा शो येत्या १५ मे पासून ‘जियो सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम सुद्धा होणार होता.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, यंदाचं ‘बिग बॉस ओटीटी ३’ रद्द करण्यात आलं आहे. कलर्स टीव्ही व जिओ सिनेमाने ‘बिग बॉस ओटीटी ३’नं करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे, पण याबद्दलची निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितनुसार, ‘बिग बॉस ओटीटी ३’ नंतर लगेचच काही दिवसांतच ‘बिग बॉस १८’ सुरू होणार आहे. दोघेही पुढे मागे सुरू होणार त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येऊ नये, म्हणून ‘बिग बॉस ओटीटी ३’ रद्द केले असल्याचे बोलले जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT