Urfi Javed Make Her New Dress With Hair Comb Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed New Fashion: 'अरे घरातले कंगवे कुठेत?' उर्फीची फॅशन पाहून नेटकरी बुचकळ्यात

Urfi Javed Make New Dress: नुकतंच उर्फीने सोशल मीडियावर तिच्या फॅशनची एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed Make Her New Dress With Hair Comb Video

आपण नेहमीच चिमटे, खिळे, पेपर ग्लास या वस्तूंचा वापर घरात वापर करतो. या रोजच्या वापरातील वस्तू आहेत. पण याच वस्तूचा वापर जर कोणी फॅशनसाठी केला तर... विचारसुद्धा करता येत नाही. पण उर्फीने या सर्व वस्तूंचा वापर करत तिची क्रिएटिव्हिटी दाखवत आपल्या फॅशनची मौज केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर तिच्या फॅशनची एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. ती नेहमीच नवनवीन फॅशन करत असते. त्यावरुन उर्फीवर अनेकदा टीकाही होतात तर कधी तिच्यावर कौतुक देखील होतं.

अशातच उर्फीचा एक नवीन लूक समोर आला आहे. तिने एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तिने कंगव्याचा वापर करुन तिचा नवा ड्रेस तयार केला आहे. (Fashion)

शक्यतो, आपण कंगव्याचा वापर हा केस विंचरण्यासाठी करतो. पण याच कंगव्याचा जर कोणी फॅशनसाठी वापर केला तर... असाच वापर उर्फीने केला आहे. रंगीबेरंगी कंगव्याचा वापर करुन उर्फीने एक अनोखा ड्रेस तयार केला आहे. या ड्रेसमुळे ती सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. (Bollywood Actress)

उर्फीच्या या स्टाईलवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. एका युजर म्हणतो, मी माझ्या घरातील कंगवा शोधत होतो. जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा धक्काच बसला. तर आणखी एक युजर म्हणतो, उर्फी कंगवा कितीला विकणार? किमान किंमत तरी सांग. अशा कमेंट करत तिच्या फॅशनवरून तिला तुफान ट्रोल करण्यात आलं आहे. तर अनेकांनी तिच्या स्टाईलचेही कौतुक केले आहे.(Trolled)

उर्फीने यापूर्वी काचा, पेपर ग्लास, टिश्यु पेपर, च्युईंगम, सिम कार्ड, पानं, फुलं अशा अनेक भन्नाट गोष्टींचा वापर करून ड्रेस तयार केले आहे. सोबतच तिने पिझ्झा, डोनल्ड अशा खाद्यपदार्थांचा वापर करुनही तिने फॅशन केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff : टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान फ्लॅट विकला, नफा वाचून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ, विदर्भाला यलो अलर्ट, वाचा पावसाचा अंदाज

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT