Bigg Boss OTT4 Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg boss Ott 4: सलमान खान नाही तर 'हा' अभिनेता होस्ट करणार बिग बॉस ओटीटी सीझन 4; चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज

Bigg boss ott 4: प्रेक्षक बिग बॉस ओटीटीची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी, शोच्या होस्टबद्दल लोकांमध्ये बरीच चर्चा आहे. यावेळी सलमान खान हा शो होस्ट करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg boss ott 4: अलीकडेच, सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉसचा १८ वा सीझन संपला आहे, त्यानंतर लोक आता त्याच्या ओटीटी व्हर्जनची वाट पाहत आहेत. बिग बॉसचा चौथा सीझन ओटीटीवर होणार आहे. आता चाहत्यांमध्ये या शोबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, चाहत्यांना सर्वात मोठा प्रश्न असा आहे की यावेळी बिग बॉस ओटीटी कोण होस्ट करणार आहे. शोचा होस्ट म्हणून लोकांना सलमान खान सर्वात जास्त आवडत असला तरी आता त्यासाठी आणखी दोन कलाकारांची नावे समोर येत आहेत.

बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर,हा सीझन चित्रपट निर्माते करण जोहर यांनी होस्ट केले होते. त्यानंतर, दुसऱ्या सीझनमध्ये सलमान खान परतला. पण त्यानंतर, तिसऱ्या सीझनमध्ये सलमान खान पुन्हा होस्ट म्हणून दिसला नाही, त्याच्या जागी अनिल कपूर दिसले. आता येणाऱ्या सीझनच्या होस्टबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. सलमान खान व्यतिरिक्त, शोच्या होस्टसाठी रोहित शेट्टी आणि सोनू सूद यांची नाव समोर आली आहेत.

सलमान खानचे नाव निश्चित झालेले नाही

बिग बॉस ओटीटीबद्दल अशी चर्चा आहे की निर्मात्यांनी या सीझनची तयारी सुरू केली आहे. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, ओटीटीच्या या सीझनमध्ये सलमान खान होस्ट म्हणून दिसणार नाही. असे म्हटले जात आहे की निर्मात्यांनी रोहित शेट्टीला त्याच्या होस्ट म्हणून बोलावण्यात येत आहे, याशिवाय सोनू सूदला देखील ही ऑफर देण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

सना मकबूल गेल्या हंगामाची विजेती होती

रोहित शेट्टी आणि सोनू सूद दोघांनीही टीव्ही शो होस्ट केले आहेत. या चौथ्या सीझनमध्ये शो कोण होस्ट करेल हा लोकांसाठी एक मोठा प्रश्न आहे. बिग बॉस ओटीटीच्या गेल्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर, या शोची पहिली विजेती दिव्या अग्रवाल होती, दुसऱ्या सीझनमध्ये एल्विश यादव आणि तिसऱ्या सीझनमध्ये सना मकबूलने हे विजेतेपद जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT