Bigg Boss OTT 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'वडापाव गर्ल'ची एन्ट्री; नवा प्रोमो होतोय व्हायरल

VadaPav Girl Will Contenstant In Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी ३ लवकरच सुरु होणार आहे. या शोचं होस्टिंग अनिल कपूर करणार आहे. या शोमधील स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस' हा शो नेहमी चर्चेत असतो. 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व लवकरच सुरु होणार आहे. या सीझनमध्ये अनेक नवीन स्पर्धक पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये दिल्लीची चंद्रिका दीक्षित म्हणजेच वडापाव गर्ल स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. वडापाव गर्लचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

जिओ सिनेमाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन ही माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर ब्लर फोटो शेअर केले आहेत. त्यात एक व्यक्ती वडापाव बनवताना दिसत आहे. या फोटोवर 'बिग बॉस ओटीटी ३'चा पहिला स्पर्धक कोण आहे, हे ओळखा, असं कॅप्शन देण्यात आले आहे. यावरुनच नेटकऱ्यांनी ती वडापाव गर्ल असल्याचे अंदाज बांधला आहे. त्यामुळे आता यंदाचा 'बिग बॉस ओटीटी ३' सीझनमध्ये खूप मज्जा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर 'बिग बॉस'चा प्रोमो व्हायरल होत आहे. त्यात एक मुलगी वडापाव बनवताना दिसत आहे. तिच्या स्टॉलसमोर खूप गर्दी झाल्याचे दिसत आहे. यानंतर 'बिग बॉस ओटीटी ३' चा लोगो दिसत आहे. यावरुनच ती वडापाव गर्ल असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

वडापाव गर्ल ही सोशल मीडियावर खूप जास्त प्रसिद्ध आहे. तिचा दिल्लीत वडापावचा स्टॉल आहे. या स्टॉलवर नेहमी गर्दी होत असते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहतावर्ग आहे.

बिग बॉस ओटीटी ३ येत्या २१ जूनपासून सुरु होणार आहे. बिग बॉस ओटीटी ३ मध्ये अनेक बदल झाले आहेत. या शोचे होस्टिंग ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर करणार आहे. सलग तीन वर्ष या रिअॅलिटी शोचा होस्ट बदलत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT