Elvish Yadav And Raghav Sharma Confront Mob In Jammu Saam TV
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav Viral Video: एल्विश यादव पुन्हा चर्चेत; भररस्त्यात मार खाता-खाता वाचला, काय आहे नेमकं प्रकरण?

Elvish Yadav News: सोशल मीडियावर एल्विशचा वैष्णोदेवीच्या येथील काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिथे असं काही घडलं त्यामुळे प्रसिद्ध युट्यूबरवर थेट पळून जायचीच वेळ आली आहे.

Chetan Bodke

Elvish Yadav And Raghav Sharma Confront Mob In Jammu

‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने नुकताच आपल्या मित्रांसोबत वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. सध्या सोशल मीडियावर एल्विशचा वैष्णोदेवीच्या येथील काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिथे असं काही घडलं त्यामुळे प्रसिद्ध युट्यूबरवर थेट पळून जायचीच वेळ आली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, एल्विश यादव तेथील स्थानिक लोकांसोबत भांडताना दिसत आहे. नेमकं एल्विशमध्ये आणि तेथील स्थानिकांमध्ये कोणत्या कारणांमुळे वाद झाला?, खरंच हा वाद झालाय का?, या व्हिडीओमागील सत्य आपण जाणून घेणार आहोत.

नुकतंच युट्यूबर एल्विश यादव आणि निर्माता राघव शर्मा या दोघांनीही वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्या दोघांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, एल्विश आणि राघव गर्दीने घेरलेले दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक स्थानिक नागरिक एल्विशचा मित्र राघव शर्मा ह्याची कॉलर पकडून त्याच्यासोबत भांडताना दिसत आहे.

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने एल्विश आणि राघवला त्याच्यासोबत फोटो काढण्यास सांगितले होते, पण दोघांनीही त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने राघवची कॉलर पकडली. नंतर तो राघवला ढकलून निघून गेला. त्यांच्या आजूबाजूला लोकांची खूप गर्दीही पाहायला मिळत आहे. (Social Media)

एकाने राघव शर्माची कॉलर पकडल्यामुळे, हे तू काय करतोस?, तू कोण आहेस? असा प्रश्न विचारतो. तर एल्विश यादव अगोदरच तेथून निघून जातो. काही दिवसांपूर्वी नोएडा पोलिसांनी युट्यूबरला सापाच्या विष तस्करी प्रकरणी चौकशी केली होती.

त्या चौकशीमध्ये, एल्विश यादवने आपल्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याची प्रतिक्रिया एल्विशने दिली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; २-३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT