प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस १७'चा (Bigg Boss 17) ग्रँड फिनाले अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'बिग बॉस १७'तल्या सर्वच स्पर्धकांसाठी शेवटचा आठवडा खूपच रंगतदार होताना दिसत आहे. या शोच्या ग्रँड फिनालेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारीला होणार आहे.
टॉप ५ स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थिती लावताना दिसत आहे. 'बिग बॉस ओटीटी २' फेम पूजा भट्ट नुकतीच मन्नारा चोप्राला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आली होती. यावेळी तिने मन्नारासोबत आणखी एका स्पर्धकाला सपोर्ट केले आहे.
मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या स्पर्धकांना सपोर्ट करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ग्रँड फिनालेमध्ये येणार आहेत. यावेळी पूजा भट्टही येणार आहे. नुकतंच अभिनेत्री पूजा भट्टचा मन्नारा चोप्राला सपोर्ट करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मन्नाराला सपोर्ट केल्यानंतर पापाराझींनी पूजाला मुनव्वरबद्दल प्रश्न विचारला आहे. दरम्यान, पूजा भट्टने मुनव्वरबद्दल दिलेली प्रतिक्रिया बरीच चर्चेत आली आहे.
" खरं तर मी इथे मन्नाराला सपोर्ट करायला आलेय." बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना पूजाने पापाराझींना अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, पूजा भट्टला मुनव्वरबद्दल विचारले असता ती म्हणाली, "मुनव्वरलाही एक परवानगी मिळावी. अनेकांनी त्याच्या खासगी आयुष्यामध्ये तमाशा बनवून ठेवला आहे. त्याला थोडं शांत राहू द्या. तो त्याचा खेळ बरोबर खेळेल." अशी तिने प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर मुनव्वर तगड्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक असल्याचे मानले जातंय. त्यालाही सोशल मीडियावरून खूपच चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळतोय. मुनव्वरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सपोर्ट करीत आहेत. त्याला सपोर्टसाठी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राही येणार आहे.
गेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडेला सपोर्ट करण्यासाठी अमृता खानविलकरने हजेरी लावली होती. तिच्यासोबत रश्मी देसाई सुद्धा येणार होती. पण काही कारणामुळे तिचं येणं रद्द झालं. तर मन्नाराला सपोर्ट करण्यासाठी पूजा भट्ट येणार आहे. अरुण माशेट्टीला अभिनेता संदीप सिकंद येणार आहे. तर अभिषेक कुमारला सपोर्ट करण्यासाठी शालिन भानोट येणार आहे. त्यासोबतच अनेक काही सेलिब्रिटीही यावेळी उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.