Bigg Boss 2 contestant Elvish Yadav And Aashika Bhatia Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : बिग बॉसच्या घरात मोठी घडामोड; वाइल्ड कार्डने होणार धमाकेदार एन्ट्री, आल्या आल्या नवा टास्क पूर्ण करणार

Bigg Boss OTT 2 Contestant : एल्विश यादव आणि आशिका भाटिया 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये प्रवेश करणारे वाईल्ड कार्ड स्पर्धक आहेत.

Pooja Dange

BB OTT 2 Vaild Card Entry : बिग बॉस ओटीटी सीजन २ची टीआरपी पाहता निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 'बिग बॉसच्या घरामध्ये २ वाईल्ड कार्ड स्पर्धक घेण्याचे ठरवले होते. परंतु आता ३ स्पर्धकांना वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री मिळणार आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धकांची झाली आहेत.

'बिग बॉस ओटीटी २'मध्ये प्रवेश करणारे स्पर्धक आहेत, एल्विश यादव आणि आशिका भाटिया. तर पलक पूरस्वानी देखील बिग बॉसच्या घरामध्ये परतणार आहे. या स्पर्धांच्या एन्ट्रीने घरतील समीकरण कशी बलणार हे आपल्याला आगामी भागात पाहायला मिळणार आहे. (Latest Entertainment News)

वाईल्ड कार्ड एन्ट्रीसह या आठवड्यात घरामध्ये कॅप्टन्सी टास्क देखील होणार आहे. जिओ स्टुडिओजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एल्विश यादव आणि आशिका भाटिका दिसले आहेत. तर हे दोघे कॅप्टन्सी टास्कसाठी पहिल्यांदा अविनाश सचदेव आणि मनीषा रानीला बोलवले.

बिग बॉसने या नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांना नवा कॅप्टन निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे या आठवड्यात कॅप्टन कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या जिया शंकर घरातील कॅप्टन आहे. तर फलक नाझ, जड हदीद आणि अभिषेक मल्हान यांना बिग बॉसची कॅप्टन्सी मिळाली आहे.

एल्विश यादव आणि आशिका भाटिका कोण आहेत?

पलक पुरस्वानी व्यतिरिक्त, सर्वांच्या नजरा एल्विश आणि आशिकावर आहेत ज्यांनी 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. आशिका भाटियाबद्दल एक टीव्ही अभिनेत्री आहे तिने 'मीरा' आणि 'परवरिश' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर आशिकाने प्रेमरत्न धन पायोमध्येही काम केले आहे. तर एल्विश हा YouTuber आहे.

बिग बॉसच्या घरातील वातावरण कसे आहे ?

एल्विश यादव हा अभिषेक मल्हानसारखा यूट्यूबर आहे. आत्तापर्यंत तो फुकरा इन्सानला सपोर्ट करत होता. आता तो घरात कोणाला पाठिंबा देणार हे पाहावे लागेल. त्याचबरोबर आशिका भाटिया कोणाला पाठिंबा देणार हे देखील महत्त्वाचे आहे. पूजा भट्ट कॅम्प आणि दुसरा अभिषेक मल्हानचा ग्रुप घरात पाहायला मिळत आहे. आशिका कोणत्या ग्रुपमध्ये जाणार यावर प्रेक्षकांचे लक्ष आहे.

पलक पुरस्वानीच्या एन्ट्रीनंतर फलक आणि अविनाशचं काय ?

पलक पुरस्वानीच्या एन्ट्रीनंतर अविनाश आणि फलकची केमिस्ट्रीच काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अविनाश सचदेवने फलकला प्रपोज केले. त्याने सांगितले की त्याला फलक आवडते. पलक पुरस्वानी आणि अविनाश सचदेवचा 36 आकडा आहे. दोघांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केले आहे आणि आता एकमेकांचे तोंडही बघत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT