Amruta Dhongade Instagram @amrutadhongade_official
मनोरंजन बातम्या

Amruta Dhongade: कोल्हापूरची बिजली अमृता धोंगडे स्पर्धेतून बाहेर, जाणून घेऊया कशी होती अभिनयातील तिची एन्ट्री

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या अमृता धोंगडेचा प्रवास अजूनही अडथळे.

Pooja Dange

Bigg Boss Marathi 4 Grand Finale: 'बिग बॉस मराठी ४'चा आज अंतिम सोहळा पार पडत आहे. १०० दिवस या घरत राहणे कोणालाही सोपे नव्हते. स्पर्धकांना नेहमीच शारीरिक आणि मानसिक अशा सर्वच लढ्याच्या होत्या. या सगळ्यात आपल्या धाकड अंदाजात दिसली ती म्हणजे अमृता धोंगडे. या बिनधास्त अमृताचा कसा होता प्रवास, चला जाणून घेऊया.

अमृता घराघरात गेली ती झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेच्या माध्यमातून. ही अमृताची पहिली मालिका होती. तर 'बिग बॉसचा ३ चा विजेता विशाल निकमसह अमृताने एका चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. एक धून, इथून तिथून मुथुन असे या चित्रपटाचे नाव होते. १३ जुलै, २०२८ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

अमृता धोंगडे जितकी साहसी आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसली, तितकीच साहसी ती खऱ्या आयुष्यात देखील आहे. तिला साहसी खेळ खेळण्याची आवड देखील आहे. तिने तिचे वॉटरफॉल रॅपलिंगचे व्हिडिओ देखील तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमृताला रणवीर सिंग खूप आवडतो. तर अभिनेत्री माधुरी दीक्षित तिची रोल मॉडेल आहे.

अमृता उत्तम डान्स करते हे आपण पाहिले आहे. तिने कथ्थकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अमृताने पुण्याच्या भारती विद्यापीठातून बीएससी पदवी घेतली आहे. तिने इंजिनिअर व्हावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण तिने अभिनेत्री व्हायचे ठरवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taapsee Pannu Fitness Tips: तापसीसारखी फिगर हवी आहे? फिटनेससाठी या टिप्स फॉलो करा

Winter Season: थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Anupam Kher: वयाच संबंध नाही! या व्यक्तीनं चालवली सर्वात छोटी सायकल, अनुपम खेर यांनी पोस्ट केला व्हिडीओ

Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई - संजय राऊत

Health Tips: महिलांनी 'या' समस्येत अननसाचे सेवन करणे टाळावे

SCROLL FOR NEXT