Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: सूरजची कळी खुलली... 'ती' भेटताच म्हणाला; 'माझी हिरोईन आहेस तू' Video व्हायरल

Suraj Chavan Video: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज झाल्यानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. असाच एक व्हिडीओ सूरजचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

बारामतीचा रिल्स स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सूरजने त्यांच्या मनोरंजन स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. गरीब परिस्थितीतून मोठा झालेला सूरज नक्कीच सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. बिग बॉस मराठीचा विजेता सूरज झाल्यानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. असाच एक व्हिडीओ सूरजचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने सिद्धीविनायक गणपती आणि जेजूरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर बारामतीतील सूरजच्या मोढवे गावी स्वागत मिरवणूक काढण्यात आली. आता गावी पोहचल्यानंतर सूरजला त्याची मैत्रिण भेटायला आली आहे. काजल शिंदे असं सूरजच्या मैत्रिणीचं नाव आहे. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत काजल सूरजला विचारते, ‘विसरलाय होय मला’. त्यावर सूरज नकार देतो. ‘तू माझी हिरोईन आहेस’, असं तो काजलला म्हणतो. त्यावर काजल म्हणाली, मला वाटलं की तू मला विसरलास, पुढे काजल सूरजचं अभिनंदन करते आणि असाच आयुष्यात पुढे जा असं म्हणते.

सूरजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिक्रिया येत आहेत. तर एकाने ‘सूरज हीच ती आमची वहिनी शोभेल, तुला खरंच जिवापाड जपेल अशी कमेंट केल्या आहेत. सूरजने गावी गेल्यानंतर सर्वांची भेट घेतली आहे. गावातील त्याच्या शाळेत जाऊन त्याने विद्यार्थांना खूप शिका आणि मोठे व्हा असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

Gold Rate Fall : सोनं स्वस्त झाले रे! आठवडाभरात किंमत ₹१९०० घसरली, वाचा २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Personal Loan चा अर्ज करताना बँक Blank cheque का मागते? काय आहे नियम, जाणून घ्या सर्वकाही

SCROLL FOR NEXT