Marathi Actress Megha Dhade Enter In Politics Saam Tv
मनोरंजन बातम्या

Megha Dhade Joins BJP: बिग बॉस फेम मेघा धाडेची नवी इनिंग, अभिनयानंतर आता राजकारणात एन्ट्री

Megha Dhade News: ‘बिग बॉस मराठी’ फेम मेघा धाडेने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे.

Chetan Bodke

Marathi Actress Megha Dhade Enter In Politics: ‘बिग बॉस मराठी’ फेम मेघा धाडेने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. मेघा धाडेनं १४ जून (बुधवारी) मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेत्रीने प्रवेश केला आहे. मेघाच्या पक्षप्रवेशावेळी भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या. इट्स मज्जा या इंस्टाग्राम पेजने मेघाचा पक्षप्रवेश करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहे. राजकारण आणि मनोरंजनसृष्टीचं नाते फारच घनिष्ठ नातं आहे. भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर देखील बरेच सेलिब्रिटी आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी भाजपाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रिया बेर्डेंनी २०२० मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. फार कमी दिवसात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आता भाजपात प्रवेश केला आहे.

मेघा धाडेबद्दल सांगायचे तर, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनचीती विजेती होती. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमधून मेघा धाडेला महाराष्ट्रातील घराघरात एक वेगळीच ओळख प्राप्त झाली. तिने आपल्या दमदार खेळीने चाहत्यांना आपल्याकडे सर्वाधिक प्रभावित केले. मेघाचा बेधडक स्वभाव आणि बुद्धीचातुर्यामुळे ती बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेली कंटेस्टंट ठरली. मेघा सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT