Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : टॉपचा किंग आलाय...! सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा पोस्टर रिलीज; चित्रपटात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी?

Zapuk Zupuk Movie Poster Release : 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे हटके पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan ) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. 'झापुक झुपूक' या चित्रपटाच्या ह्या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरे पाहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे.

पोस्टरला सूरज चव्हाणने हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "टॉपचा किंग आलाय पिक्चर मधल्या आख्यांना घेऊन...आता २५ एप्रिलपासून आख्खं थिएटर हादरणार! तयार रहा, कारण हा पिक्चर एकदम झापुक झुपूक असणार! नाहीतर बुक्कीत टेंगुळ ..." त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'झापुक झुपूक' चित्रपटाच्या पोस्टमध्ये पाहू शकतो की, सूरज बैलगाडी ओढत आहे. तर त्याच बैलगाडीवर बाकी सर्व कलाकार स्वार आहेत. सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू आहे. यामुळे चित्रपटाची कहाणी जाणून घेण्यास चाहते आतुर आहेत. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे उत्तम कलाकारांमुळे हा चित्रपट नक्कीच सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'झापुक झुपूक' चित्रपटात 'प्रीतीचा वनवा उरी पेटला' मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, 'अबीर गुलाल' मालिकेतील पायल जाधव, 'तुमची मुलगी काय करते' मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या दमदार टिझर आणि पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT