Nikki Tamboli Pandharinath Kamble Clashes Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : कपड्यांची फेकाफेकी अन् कॅप्टनसोबत धक्काबुक्की; निक्कीच्या कल्ल्याने झाली आठवड्याची सुरुवात

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या घरातील खेळात दिवसेंदिवस ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळीने घरात राडा घातला होता. तर दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरने जोरदार राडा घातला. दोघींनाही रितेशने चांगलेच खडेबोल सुनावले. आता पुन्हा एकदा तिसऱ्या आठवड्यात निक्कीने जोरदार राडा घातला आहे. सध्या सोशल मीडियावर आठवड्यातील पहिल्याच दिवसाच्या प्रोमोची जोरदार चर्चा होत आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच निक्की घरातील सदस्यांवर कमालीची संतापलेली दिसत आहे.

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अवघ्या काही तासांपूर्वीच प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. प्रोमोमध्ये, निक्की रागाच्या भरामध्ये लिव्हिंग रुममध्ये येताना दिसत आहे. यावेळी ती पॅडीसह इतर सदस्यांवर चांगलीच भडकलेली दिसली. निक्की पॅडीला म्हणतेय, "माझ्या वस्तुंना का हात लावला?" त्यावर पॅडी म्हणाला, "मी माझी ड्युटी करतोय...." पॅडीच्या उत्तरावर निक्की म्हणाली, "मला कामं करायची आहेत...समजलं ना" त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते.

पॅडी निक्की म्हणतो,"माझ्या कपड्यांना हात लावू नकोस". त्यानंतर पुढे कोकण हार्टेड गर्ल अंकिता म्हणते,"तुझ्या आवाजाला इथे सगळ्यांनी घाबरुन राहायचं का इथे". त्यावर निक्की 'हो' असं उत्तर देते. यावेळी भांडणाच्या भरात निक्कीने कॅप्टन अंकिता वालावलकरला धक्काबुक्की केली. यावेळी निक्की धनंजय पवार, पॅडी कांबळे, कॅप्टन अंकिता वालावलकरसह इतर स्पर्धकांवरही ती चांगलीच संतापली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. आता तिसऱ्या आठवड्यात सदस्य कसा कल्ला करणार हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT