टेलिव्हिजनचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १६ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून आज (शनिवार) यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश भाऊ सर्वच सदस्यांची पोलखोल करणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये रितेश भाऊ कोणकोणत्या स्पर्धकांची कानउघडणी करणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव यांच्यात टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या चौघांमुळे यंदाचा आठवडा कमालीचा गाजला. सध्या निक्की तांबोळीची अख्ख्या मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. तिच्यावर मराठी इंडस्ट्रीतले सर्वच कलाकार टीका करत असून तिला तुफान ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
रितेश देशमुख 'भाऊचा धक्का'मध्ये कोणकोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार ? कोणाकोणाचं कौतुक करणार ? एकंदरीतच 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुख स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे साहजिकच कल्ला तर होणारच...
यंदाच्या आठवड्यात 'नॉमिनेशनची तोफ' हे नॉमिनेशन कार्य होतं. या कार्यात अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, पुरूषोत्तामदादा चव्हाण, वर्षा उसगांवकर या सहा स्पर्धकांना नॉमिनेट केलं. आता पहिल्या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाला घराबाहेर जावं लागणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय."
रितेश पुढे म्हणाला,"'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार".
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.