Nikki Tamboli News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli News: "तुझा कोणी नाही, तर मी आहे ना" निक्कीला सूरजनं दिला धीर

Bigg Boss Marathi Season 5: अरबाज बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर निक्की भावुक झालेली होती. अशातच निक्कीने सूरजला धीर दिला आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य वाद, भांडणं करण्यासोबत काही नातीदेखील चर्चेत आली आहेत. बिग बॉसमध्ये कधी प्रेमाचे वारे तर कधी राडे पाहायला मिळतात. अशातच बिग बॉसच्या घरातून अरबाजची एक्झिट झाल्यानंतर निक्की भावुक झालेली दिसली. बिग बॉसने अरबाजला एलिमेट जाहीर करताच निक्की ढसाढसा रडू लागली. यादरम्यानचा भावनिक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

निक्कीने अरबाजचे पाय धरत, त्याला तु जाऊ नको... आता मी कोणाशी बोलू अशा भावना व्यक्त केल्या होत्या. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात,"सूरज निक्कीला दिलासा देत म्हणतोय,"तुझा कोणी नाही...मी आहे ना". त्यावर निक्की म्हणतेय,"तू आहेस ना. तुझ्यासोबत गप्पा मारायला बसेल मी". सूरज त्यावर म्हणतोय,"आपलं कुटुंब आहे, घर आपलं आहे. आता रडायचं नाही...स्ट्राँग व्हायचं". निक्की सूरजला उत्तर देत म्हणतेय,"स्ट्राँग तर आहेच...पण दु:खी झाले आहे".

बिग बॉसच्या घरात निक्की आणि सुरज याचं नातं चांगलं आहे. या दोघानी रक्षाबंधनाचा सणदेखील जल्लोषात साजरा केला. या रक्षाबंधनाला 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्कीने सूरजला राखी बांधली होती. आता अरबाजने घराचा निरोप घेतल्याने निक्की पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे सूरज निक्कीला दिलासा देताना आजच्या भागात दिसणार आहे.

सूरज पुढे म्हणतोय,"आपला माणूस आपल्याला सोडून गेल्यावर त्या भावना आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात. आपण एकटा आलोय...आणि एकटंच आपल्या घरी जाणार. गेमवर फोकस आहे. खोटं बोलत नाही..मी लढणार...या खेळ एकट्याने खेळायचा आहे..स्वत:ला त्रास करुन घ्यायचा नाही".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT