Jahnavi Killekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : जो नडणार, त्याला भिडणार; बिग बॉसच्या घरात जान्हवी सुसाट

Jahnavi Killekar : छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळणार हे नक्कीच आहे.

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळत आहे.

जान्हवीने तिच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगितले की, "माझी सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झाली आहे. मी माझ्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राची खलनायिका ही एक टॅगलाईन झाली आहे. मी आता हिरोईन वगैरे काही करूच शकत नाही. आता तुम्ही मला सगळे पाहाल की, जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे ते."

जान्हवीने सांगितले की, "घरात फोन नसणार हे समजल्यावर मला थोडे आश्चर्यच वाटले. मला नाही माहिती की आता १०० दिवस घरात काय करणार. माझी काय अवस्था होणार कारण.. मी कायम फोनवर असते. आता या सगळ्यापासून एका वेगळ्याच जगात जायचे आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटणार आहेत. त्यांना कसे डील करायचे ते समजणे कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल."

जान्हवीने घरच्यांना सांगितले तेव्हा ती म्हणाली, "सगळ्यांना शॉक बसला. सगळे मला म्हणाले जमणार का तुला? पण माझे घरचे एकदम खुश आहेत, विशेषतः माझा मुलगा. माझा मुलगा मला म्हणाला जा आणि मजा कर." जान्हवीने घरातल्या कामांबद्दल सांगितले की, "मला कोणतीच काम करायला आवडत नाही. मी माझ्या घरीही काम करत नाही, पण आता करावं लागेल. माझ्या जाण्याने गोंधळ होणार आहे, पण सगळ्यांना मनोरंजन नक्कीच करीन."

जान्हवीने पुढे म्हणाली, "मी घरात कसलीही प्लॅनिंग करून चालले नाही, कारण आपण करतो एक आणि वास्तवात होत एक म्हणून मी काही तयारी केली नाही. मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी; १० तासांपासून वाहतूक ठप्प, गावातील २०० जणांचं स्थलांतर

Tanaji Sawnat : तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिमंळात एन्ट्री होणार? शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण | VIDEO

Education News: मोठी बातमी! तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT