Bigg Boss Marathi Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "38 वर्षांमध्ये जे प्रेम मी माझ्या..."; DP दादाने अंकिताला खरं खरं सांगितलं

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा गेम काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाचा सीझन सर्वत्र खूप गाजला आहे. बिग बॉसने अधिकृत घोषणा करून 100 दिवसांचा खेळ 70 दिवसांत संपणार असल्याचे सांगितले आहे. बिग बॉसच्या घरात पॅडी दादा, वर्षा ताई, डिपी दादा, अंकिता, निक्की, अभिजीत, सूरज आणि जान्हवी हे सदस्य आहेत. आता फक्त बिग बॉस घरात 8 सदस्य उरले आहेत. यांपैकी कोणाला फायनलचं तिकीट मिळवणार आणि कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात रहस्यमय खेळी सुरू आहे. आजच्या 'UNSEEN UNDEKHA' मध्ये तुम्ही पाहू शकता, DP दादा आणि अंकीता गार्डन एरियात बसले असताना DP दादा अंकीताला बहिणीच्या प्रेमाबद्दल सांगताना म्हणाले,"38 वर्षांमध्ये जे प्रेम मी माझ्या बहिणींना दिले तेच प्रेम मी इथे या घरात फील केले. या सगळ्यांचे क्रेडिट धनंजय पोवार यांना जाते."

यावर अंकीता म्हणाली,"या सगळ्यांचे क्रेडिट तुम्हाला नाही मला जाते. माझ्या सारखी एखादी चांगली मुलगी तुम्हाला जर या घरात मिळाली नसती तर तुमचे प्रेम कसे जागरूक झाले असते? एक भावाला त्याच्या भावना जागरूक करण्यासाठी माझ्या सारख्या एका बहिणीला या घरात यावे लागले. माझ्या सारखी बहीण तुम्हाला पुर्ण कोल्हापूरात सापडली नसती." यावर DP दादा म्हणाले," कोल्हापूरमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात पण सापडली नसती."

पुढे अंकीता म्हणाली,"दादा पण मी तुम्हाला लाभली. मी तुम्हाला शिकवले कसे रडणाऱ्या बहिणीचे सांत्वन कसे करायचे.तिला आधार कसा द्यायचा म्हणून आज तुम्ही खंभीर होऊन डम्बल उचलू शकतात. नाहीतर या घरात तूम्ही आज लोळत पडला असता किंवा शौच्यालयात झोपताना दिसला असता. पण मी तुमचे भांडे फोडले आणि त्यामुळे कळले."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : आमदार निवासात 'प्रहार'

Rain Alert : पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; सोलापुरात नद्यांना पूर, पुणे पुन्हा पाण्यात

Konkan : वाळूचा डोंगर बनला पर्यटनाचे आकर्षण

Marathi News Live Updates: पुण्यात अवघ्या 3 तासात 124 मिलिमीटर पाऊस

Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून काही होणार नाही; गिरीश महाजन जरांगेंना असे का म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT