Irina Rudakova And Vaibhav Chavhan News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण परदेसी गर्लच्या प्रेमात? 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो व्हायरल

Irina Rudakova And Vaibhav Chavhan News : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलनंतर आता बिग बॉसच्या घरात आणखी एक लव्हस्टोरी दिसण्याची शक्यता आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील आठव्या दिवसाचा प्रोमो व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

भांडण, मारामारी, मैत्री आणि प्रेम हे गणित बिग बॉससाठी काही नवीन नाही. बिग बॉसच्या घरातल्या अनेक कपल्सने रियल लाईफमध्ये एकमेकांना लाईफ पार्टनर म्हणून निवडून नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सुरूवात झाली. सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा बॉन्ड प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखी एक लव्हस्टोरी दिसण्याची शक्यता आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील आठव्या दिवसाचा प्रोमो व्हायरल होत आहे.

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. या नव्या प्रोमोमध्ये, वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना दिसत आहे. त्यासोबतच तो तिला सर्वाधिक महत्त्व देतानाही दिसून येत आहे. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतो, "कालपेक्षा आज जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय." त्यावर इरिना 'हो' असं उत्तर देते.

तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते,"फॉरेनची पाटलीन मस्त आहे..." तर निक्की म्हणते, "भाई... तुझं काय चाललंय" बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की नाटक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं या कॅप्टनसी कार्याचं नाव आहे. या कार्यामध्ये स्पर्धकांचे आपआपसात वाद होताना दिसत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण असे १६ स्पर्धक आहेत. गेल्या रविवारी पुरुषोत्तमदादा पाटील हे एलिमिनेट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT