Suraj Chavhan And Janhvi Killekar Fighting Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : "तू निघ, चल फूट...", निक्कीनंतर सूरज चव्हाणने जान्हवी किल्लेकरचा आवाज केला बंद

Suraj Chavhan And Janhvi Killekar Fighting : आपल्या खास स्टाईलने सर्वांनाच आपलंसं करणाऱ्या गोलीगत सूरज शिंदेने घरातल्या स्पर्धकांना आपला इंगा दाखवायला सुरूवात केली आहे. आजच्या एपिसोडच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सूरज आणि जान्हवीचा जोरदार वाद झाला आहे.

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धकांचा खेळ चांगलाच रंगात आला आहे. बिग बॉसचं घर म्हटल्यावर वाद आणि राडा हा तर होणारच. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये जोरदार राडा आणि स्पर्धकातील हमरी- तुमरी आपण पाहिली. शनिवारी आणि रविवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेश देशमुखने सर्वच स्पर्धकांची कानउघडणी केली. त्याशिवाय खेळण्याचीही स्ट्रेटेजी स्पर्धकांना त्याने सांगितली. आता इतकं झाल्यानंतरही पुन्हा एकदा स्पर्धकांमध्ये जुंपली.

२८ जुलैपासून ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं दार उघडलं. यावेळी एकूण १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यावेळी अनेक स्पर्धक येताच त्यांनी आपला इंगा दाखवायला सुरूवात केली तर, काहींनी शांत राहत स्पर्धकांचा खेळ बघत आता आपलं खर रुप दाखवायला सुरूवात केली आहे. आपल्या खास स्टाईलने सर्वांनाच आपलंसं करणाऱ्या गोलीगत सूरज शिंदेने घरातल्या स्पर्धकांना आपला इंगा दाखवायला सुरूवात केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम हँडलवर दुसऱ्या आठवड्यातला पहिला प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरज चव्हाण भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणतेय, "तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना ? माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही...." त्यावर गोलीगत सूरजने जान्हवीला "तू निघ... चल फूट" असं प्रत्युत्तर दिले आहे. गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल.

सूरज चव्हाण आपल्या शांत स्वभावामुळे सर्वत्र चर्चेत राहिला. त्यामुळे त्याला अनेकांनी एलिमिनेटही केले होते. त्यासोबतच त्याच्या शिक्षणावर आणि बुद्धिमत्तेवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. आता यासर्वांनंतर सूरजने आपला इंगा सर्वच स्पर्धकांना दाखवायला सुरूवात केली आहे. एका खेडेपाड्यातून आलेल्या सूरजने दुसऱ्या आठवड्यापासून खरा गेम खेळायला सुरूवात केली आहे. ‘भाऊचा धक्का’वर रितेशने सूरजचे कौतुक केले आहे. सूरजला त्याच्या प्रसिद्धीमुळे सर्वाधिक मत मिळाली. त्यामुळे तो सर्वात स्पर्धक म्हणून सेफ झाला होता.

'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT