Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

काय सांगता! Bigg Boss Marathi 5 चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार,कुठे अन् कधी वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi 5: सोशल मीडियावर कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला असून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचवे पर्व कायमच चर्चेत आहे. आता पुन्हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या पर्वाचा फिनाले पुन्हा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला असून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व चांगलेच गाजले. यंदाच्या पर्वात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहिल्याच आठवड्यापासून बिग बॉस मराठीच्या पर्वाने प्रेक्षकांची मने जिंकली. टीआरपीचे देखील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मोठी मजल मारली होती. १०० दिवसांचा बिग बॉस मराठीचा शो ७० दिवसांत संपल्याने प्रेक्षकांमध्ये मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळाला. अशातच कलर्स मराठीने मोठी घोषणा करत चाहत्यांनी सुख:द धक्का दिला आहे.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची हटके झलक दिसत आहे. अलिया भट्टदेखील उपस्थित आहे. होस्ट रितेश देशमुख हटके अंदाजात प्रेक्षकांशी बोलताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये, प्रेक्षकांच्या आग्रहावरून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, तोच जबरदस्त कल्ला आणि तोच थरार, परत अनुभवता येणार! रविवार २७ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT