Bigg Boss Martahi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: पर्सनल भांडण काढणं गरजेचं नव्हतं, अमृता धोंगडेचा 'त्या' आरोपावरुन अपूर्वा नेमळेकर भडकली

'बिग बॉसच्या घरात निर्माण झाले पर्सनल गोष्टींवरून वाद.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बिग बॉस मराठी 4'चे (Bigg Boss) घर म्हणजे वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपाचे मैदान आहे. 'बिग बॉस'च्या दुसऱ्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांची शाळा घेतली. तसेच स्पर्धकांची एकमेकांविषयीची मते सुद्धा जाणून घेतली. पहिल्या एलिमिनेशनमध्ये निखिल राजेशिर्के बिग बॉस घराबाहेर जाणारा पहिला स्पर्धक ठरला. चावडीनंतर दुसरा दिवस नवीन ट्विस्ट घेऊन येतो. कारण महेश मांजरेकरांनी घेतलेली शाळा आणि प्रेक्षकांनी केलेली चुगली यामुळे स्पर्धकांचे सावध होतात.

आज 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या नॉमिनेशन कार्यात अमृता धोंगडे आणि अपूर्वा यांच्या आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. अमृताने नॉमिनेशन कार्यात दिलेल्या कारणांमुळे अपूर्वाचा पारा चढला आहे. अमृताचे म्हणणे आहे की, तू मला आठवडाभर दिसली नाही. त्यावर अपूर्वा म्हणाली, "पर्सनल भांडण काढणं गरजेचं नव्हतं, तुझ्या निकषांनी जर मी चर्चेत नसेल तर मला फरक पडत नाही. माझ्यावर जे चुकीचे आरोप करता ना ते बंद करा..." असे अमृताने अपूर्वाला सुनावले. "हा गुरुर शेवटपर्यंत राहू दे अमृता, आज माझी बाजू तुझ्याकडे होती ना, एक दिवस तू माझ्या हातात असशील हे लक्षात ठेव", असे अपूर्वा अमृताला म्हणाली.

कलर्स मराठीने सोशल मीडियावर (Social Media) याचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अमृता आणि अपूर्वा एकमेकींवर चांगल्याच भडकल्या दिसत आहेत. त्यांची ही भांडण 'बिग बॉसच्या घरात किती दिवस चालणार आणि त्याचा घरात काय परिणाम दिसणार हे आपल्याला येत्या दिवसात कळणार आहे.

'बिग बॉस'च्या घरामध्ये आज काय घडले? कोणी कोणाला नॉमिनेट? हे आपल्याला आजच्या भगत पाह्यला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT