Bigg Boss Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: पूर्वीची दुष्मनी आता करते 'या' दोघांची गोड मैत्री

अपूर्वा आणि प्रसादची ओळख खूप वर्षांपासूनची आहे. त्यांच्यात पुर्वी काही वाद ही झाला होता. बिग बॉसच्या घरात अपूर्वाने एन्ट्री करताच तिने प्रसादला पाहताच चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पहिल्या दिवसापासून सर्वाधिक भांडणाला तोंड फुटलेल्या 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरात सध्या बऱ्यापैकी आलबेल सुरु असल्याचे दिसत आहे. एकाहून एक अतरंगी स्पर्धक, काही तरी विषायावरून आपल्या सहकार्याला चिडवणे ही अतरंगी मस्ती सध्या दिसत आहे. (Bigg Boss Marathi) भांडण आणि मस्तीचा मिलाप करत सर्व स्पर्धक खेळाचा आनंद लुटत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झालेले भांडण काही काळासाठी का होईना दिसत नाही. दोन आठवड्याहून अधिक काळ हे स्पर्धक एकाच घरात एकत्र राहत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडी निवडी सर्वांना कळत आहे. (Marathi Entertainment News)

याच आवडी- निवडीचा आधार घेत स्पर्धक एकमेकांशी मस्ती करत आहे. मैत्री एका बाजूला तर खेळातील दुष्मनी एका बाजूला. असेच बिग बॉस मराठीच्या घरात दोन स्पर्धक आहेत. त्या स्पर्धकांचे नाव अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे असे आहे. घरात अपूर्वानं प्रसादचा खरा चेहरा समोर आणला आहे का? चला जाणून घेऊया घटना.

अपूर्वा आणि प्रसादची ओळख खूप वर्षांपासूनची आहे. सर्व सदस्यांसमोर अपुर्वाने सांगितले की, त्यांच्यात काही जुन्या विषयांवरून वाद झाले होते. जेव्हा बिग बॉसच्या घरात अपूर्वाने एन्ट्री केली होती त्यावेळी तिने प्रसादला पाहताच चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. अपूर्वा बोलते, "पहिल्याच दिवशी प्रसादला पाहून माझा राग अनावर होत होता. माझ्या पहिल्या मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेले होते तेव्हा तो सेट प्रसादचा होता. तेव्हा मला तिथे बघून त्याने तोंड वाकडं केलं होतं. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले". (Marathi Actors) (Marathi Actress)

तसेच अपूर्वा पुढे बोलते, "माझाकडे मनोरंजन क्षेत्रातील काहीही बॅकग्राऊंड नसताना मला मालिकेत संधी मिळाली आणि ती मालिका जवळपास दीड वर्ष चालली. मालिका संपल्यानंतर माझी आणि प्रसादची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. चित्रपटाची शूटिंग दादरच्या शिवाजी पार्कच्या चौपाटीवर होणार होती. त्यावेळी प्रसादला वाटले की, मी सहजच आली आहे. त्या सिनेमाच्या सेटवर मी एका फिमेल डिरेक्टरसोबत उभी होती. तिथे मला प्रसाद येऊन बोलतो, "काय एक सिरीयल करून संपलं का? आता लग्न करायचं आणि नवरा पोरांना घेऊन 7.30 वाजता माझी सिरीयल बघायची".

मी तेव्हा त्याच्याकडे फक्त बघितलं आणि काहीच बोलले नाही. कारण त्याची मालिका ज्या 7.30च्या स्लॉटला आहे त्याच स्लॉटला त्याच्या अपोझिट पंधरा दिवसांनी माझी सिरियल लागणार आहे आणि त्यात मी लीड रोल करते हे त्याला माहिती नव्हतं." प्रसादची मालिका ज्या स्लॉटला आहे त्याच स्लॉटला आपली मालिका आहे हे अपूर्वाला कळलं तेव्हा तिनं प्रसादला फोन केला. तेव्हा ती म्हणाली, "मला कळलं तेव्हा मी पहिला फोन प्रसादला केला आणि त्याला म्हटलं, तुझं आता वाइन्ड अप होईल त्यामुळे आता लग्न कर आणि बायका पोरांना घेऊन 7.30च्या स्लॉटला माझी मालिका बघ"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Secret Santa Gifts For Women: आला सिक्रेट सॅन्टाचा खेळ! ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांसाठी घ्या 'या' 5 उपयोगी वस्तू

Shevgyachya Shenga Recipe : थंडीत बनवा झणझणीत सुक्का शेवगा शेंगाची भाजी, वाचा रेसिपी

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात

Dhurandhar: 'मला वाटलं माझं पात्र...'; धुरंधरमुळे अक्षय खन्नाला प्रसिद्धी मिळाल्याने आर. माधवन नाराज?

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT