Dr. Nikhil Rajeshirke  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: निखिल म्हणतो, 'मला वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घ्यायची आहे...'

घराबाहेर जाताच त्याला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळावी अशी त्याने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना इच्छा व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी टेलिव्हिजन वरील सर्वाधिक गाजलेला रिॲलिटी शो म्हणजे 'बिग बॉस.' (Bigg Boss) पहिल्या दिवसापासून वादाला फुटलेले तोंड आपल्याला खूप काही सांगून जाते. सर्वच स्पर्धकांनी पहिले दोन आठवडे चांगलेच गाजवले. स्पर्धकांसोबत प्रेक्षकांचा नावडता क्षण म्हणजे एलिमिनेशनचा. सलग दोन आठवडे खेळल्यानंतर, प्रत्येकासोबत विचार जुळत असतानाच एका खेळाडूला सोडून जाणे म्हणजे सगळ्यांसाठी भावनिक गोष्ट आहे. असाच खेळ डॉ. निखिल राजेशिर्केला ही सोडवा लागला. गेल्या आठवड्यात एकूण पाच स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. त्यातून एकाला कायमचे घराबाहेर जायचे होते. (Marathi Entertainment News)

तो घराबाहेर जाताच त्याला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळावी अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे. त्याने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ही इच्छा व्यक्त केली आहे. निखिलला वाईल्ड कार्ड एंट्री विषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा निखिल म्हणाला, "मी पुन्हा बिग बॉसच्या खेळात उतरलो तर मला वोट करायला विसरू नका. कारण माझा गेम अजूनही ऑन आहे. मी बिग बॉसमधून बाहेर आलो असलो तरी मी असं समजत नाही. मी अजूनही स्पर्धेत आहे. जानेवारी पर्यंत बिग बॉस सुरू आहे. मी तोपर्यंत बिग बॉसच्या घरात दिसून सर्वांनाच आश्चर्याचा एक धक्का देईल."

तसेच तो पुढे बोलतो, "वाईल्ड कार्ड एंट्री घ्यायला मला आवडेल. वाईल्ड कार्ड एंट्री घेतली तर मी पहिला स्पर्धक असेल जो वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन शो जिंकेल". निखिलच्या चाहत्याने त्याला एका फोटोवर "जो मनापासून खेळतो तोच बाहेर पडतो" अशी कमेंट केली आहे.

त्यावर निखिल आपली प्रतिक्रिया देत म्हणतो, " मी खूप चांगलं खेळलो, अशा कमेंट्स मला बऱ्याच आल्या आहेत. बिग बॉसमध्ये फक्त भांडणं, गॉसिप करणारे हे लोक नाही तर खरी माणसंही तिथे खेळून जिंकू शकतात. आज मी बाहेर पडलो असेल तरी काय माहिती बिग बॉसला वाटलं की तिथे खरंच खऱ्या माणसाची गरज आहे तर ते मला परत बोलवतील आणि मी नक्की पुन्हा घरात जाईन आणि माझा गेम मी खरेपणाने खेळेन. तसंच खोट्या माणसांना तिथून काढण्याची स्ट्रॅटेजी मी तिथे नक्की वापरेन".

आता डॉ. निखिल राजेशिर्के पुन्हा बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT