Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: सगळं संपलं, तो आला तर मी वेडी होईल..., आईसमोरच निक्कीचा राग अनावर

Bigg Boss Marathi Nikki Tamboli: बिग बॉसच्या घरात निक्कीची आई आपल्या लेकीला अरबाजच्या आणि तिच्या नात्याबद्दल समजवताना दिसत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन टास्क होत असतात. सध्या बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आपल्या कुटुंबियाशी भेट करून दिली जात आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईची एन्ट्री झाली आहे.

बिग बॉसचा नवीन प्रोमो कलर्स मराठीने पोस्ट केला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात निक्कीची आई दिसते आहे. यावेळी निक्कीची आई आपल्या लेकीला अरबाजच्या आणि तिच्या नात्याबद्दल समजवताना दिसत आहे. निक्की तुझ्यासोबत अरबाजने जे काही केलं ते योग्य नाही. त्याचा साखरपुडा झाला आहे. हे ऐकून निक्कीला मोठा धक्का बसतो, निक्की चिडते आणि म्हणते तो आला तर मी खरचं पुन्हा वेडी होईल अस म्हणते आहे.

बिग बॉसचा मराठी सीझन ५ शो सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या टप्प्यात बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना त्याच्या कुटुंबाशी भेट होण्याची संधी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिजीत सांवतची पत्नी आणि मुलींनी बिग बॉसच्या घरात येऊन अभिजीतची भेट घेतली. नुकतीच अंकिताचे वडील आणि दोन बहिणी बिग बॉसच्या घरात आल्या आहेत. दरम्यान निक्कीची आईने देखील बिग बॉसच्या घरात लेकीची भेट घेतली आहे.

बिग बॉस मराठीचा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी अलिकडेच बिग बॉस मराठीच्या अंतिम सोहळ्याची तारिख जाहीर केली. बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला आहे. यामुळे आता नेमके कोण स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT