Arbaz-Nikki Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Bigg Boss Marathi :बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात सर्वात चर्चेत आलेली जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात सर्वात चर्चेत आलेली जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज. सुरूवातीच्या दिवसांपासून निक्की आणि अरबाज एकमेकांच्या सोबत होते. कधी भांडले तर कधी प्रेमात पडले असे असताना यांच्या नात्यात नवा ट्विस्ट येत गेला. नुकतंच निक्कीने त्यांच्या नात्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

बिग बॉसच्या दोन गटात जोड्या बनल्या होत्या ज्यामध्ये निक्की आणि अरबाज या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. रोमँटिक अंदाजात ही जोडी कायमच प्रेक्षकांची पसंत ठरली. अनेकदा या दोघांमध्ये लव्ह अँगल पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान बिग बॉसच्या घरातून अरबाज बाहेर पडणार तेव्हा निक्की ढसा ढसा रडताना दिसली.

७० दिवसांचा बिग बॉस मराठीचा शो संपला असून सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बिग बॉस संपल्यानंतर निक्की आणि अरबाज यांनी एकमेकांना वेळ दिला. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट केले.

आमच्यामध्ये जे काही आहे ते आहे. मग ते प्रेम असेल किंवा आणखी काही. पण ते सगळं उघडपणे आहे. आम्ही दोघंही एकमेकांना आवडतो. त्यानंतर तिला अरबाजचं एका शब्दांत वर्णन करायला सांगितलं. तेव्हा तिने म्हटलं की, मी अॅक्शन करुन दाखवते. मग तिने हॉर्ट केलं आणि म्हणाली हे प्रेम मैत्रीही असू शकते. प्रत्येक मुलगा आणि मुलगी कपलच आहेत, असं नसतं. आमच्यात मैत्रीतलं प्रेम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kids Health: मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय? सावधान! होऊ शकतो मायोपियाचा धोका, तज्ज्ञांनी दिली गंभीर इशारा

Genral Knowledge: पुरूषांना दाढी- मिशी येते मग महिलांना का नाही? कारण वाचून डोळे चक्रावतील

Maharashtra Live News Update: 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Bihar Government Formation: नितीश कुमार मुख्यमंत्री, भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'ही' २ नावं निश्चित

Shocking News : मैत्रीच्या आडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नौदल कर्मचाऱ्यानं केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

SCROLL FOR NEXT