Special Post By Kiran Mane For Vandana Gupte Facebook
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: “मी तिचा 'फॅन' होतो, जिच्यावर अक्षरश: 'क्रश' होता”; किरण मानेंनी दिल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा

Chetan Bodke

Special Post By Kiran Mane For Vandana Gupte: टेलिव्हिजन अभिनेता किरण माने सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणाऱ्या किरणची अनेकदा सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असते. बिग बॉस मराठी ४ मधून सर्वाधिक प्रकाश झोतात आलेल्या किरणने मध्यंतरी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीसाठी खास पोस्ट केली होती. त्यांची ती पोस्ट सोशल मीडियावर कमालीची चर्चेत राहिली होती. त्यानंतर आता किरण माने आणखी एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. यावेळी किरणने ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

नुकतीच सोशल मीडियावर किरण मानेने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना, वंदना गुप्तेंबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच एक लांबलचक पोस्टही शेअर केली आहे. किरण माने पोस्टमध्ये म्हणतात, “...काॅलेजमध्ये असताना जिचा मी 'फॅन' होतो.. जिच्या अक्षरश: 'क्रश' होतो. जिच्या आवाजाचा मी दिवाना होतो. पुढं जाऊन त्याच अभिनेत्रीचा मी हिरो म्हणून प्रमुख भुमिका मला करणार, असं कुणी सांगीतलं असतं, तर मी त्याला येड्यात काढलं असतं !” (Actors)

किरण माने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “रिहर्सल करताना स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. 'चारचौघी' मधल्या तिच्या 'फोन सीन'साठी कितीतरी वेळा ते नाटक पाहिलं होतं मी. ज्याचा त्याचा प्रश्न- संध्याछाया- सेलिब्रेशन. प्रत्येक नाटक फक्त तिच्यासाठी पाहिलं.. 'कट टू' - तिच्या शेजारी उभा राहून मी लव्ह सीन करत होतो, गाणी म्हणत होतो. आईशप्पथ! विश्वासच बसत नव्हता स्वत:वर... ...बारा वर्षांपुर्वीची ही गोष्ट ! सातार्‍यात घरी होतो. फोन वाजला. स्क्रीनवर नांव आलं 'प्रशांत दामले'."किरण, मी 'श्री तशी सौ' नाटक पुनरुज्जीवीत करतोय. तू काम करशील का? सोबत वंदना गुप्ते आहे.”

किरण माने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “पुर्वी मोहन जोशी,गिरीश ओक आणि वंदना गुप्तेंनी हे नाटक केलेले मी पाहिलंवतं. मला वाटलं मी मोहन जोशींनी साकारलेला सुत्रधार करणार. 'श्री-सौ' जोडगोळी प्रशांत-वंदना असणार असं वाटलं. जेव्हा मला समजलं की मला 'श्री' च्या भुमिकेसाठी विचारलं गेलंय आणि माझ्या 'सौ' असणार आहेत वंदना गुप्ते.. तेव्हा मी उडालोच ! सुत्रधाराची भुमिका करणार होते प्रशांत दामले... सोबत होते अक्षय पेंडसे आणि अक्षता बिवलकर... नाटक म्हणजे धुमाकुळ होता नुस्ता... फुल्ल ऑन काॅमेडी. धमाल गाणी-भन्नाट डान्स... राडा-धिंगाणा-दणका होता.. तालमीतच लै मज्जा आली.”

पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतो, “पहिला प्रयोग सुरू होताना कधी नव्हे ते लै लै लै टेन्शन आलं होतं. वंदना गुप्तेंचा हिरो म्हणून मला स्विकारतील का लोक? सगळं फसलं तर? बेक्कार हालत झाली होती. पण पहिला प्रयोगच दणक्यात पार पडला. या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. 'सुपरस्टार' प्रशांत दामलेंचा रंगभूमीवरचा करीश्मा जवळनं अनुभवला. इथंच नाय, तर इंग्लंड मध्ये लंडन-हाॅन्सलो-इलफर्ड-बर्मिंगहॅम पासून थेट स्काॅटलंड पर्यंत या नाटकाचे अनेक प्रयोग जबराट वाजले... हाऊसफुल्ल झाले. काल ३१ जुलैला या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तब्बल बारा वर्ष झाली... फेसबुकनं अलगद वर काढली, एक तपापूर्वीची गोड स्वप्न अनपेक्षितपणे सत्यात उतरवणारी ही हवीहवीशी आठवण..”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांचं कौतुक!

Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध; राऊतांचा खळबळजनक दावा

Marathi News Live Updates : अमरावतीमध्ये २ दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Sitaram Dalvi Passed Away: शिवसेनेचा झुंझार शिलेदार हरपला! माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन

Heart Attack in Garba : गरबा खेळताना तुम्हालाही येऊ शकतो हार्टअटॅक; बचावासाठी 'या' स्टेप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT