मराठी अभिनेता जय दुधाणे नुकताच लग्न बंधनात अडकला.
जयने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
शाही थाटात दोघांचा विवाह सोहळा पार पडला.
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता जय दुधाणे लग्न बंधानात अडकला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जय दुधाणेने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याला त्यांचे बिग बॉस मराठी मधील मित्रमंडळींनी हजेरी लावली. दोघेही लग्नात सुंदर दिसत होते. त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जय आणि हर्षलाने लग्नात पारंपरिक लूक केला होता. जयने पिवळ्या रंगाचा डिझाइनर कुर्ता आणि धोतर नेसले होते. पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता. जयच्या कुर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यातील नक्षीकाम खूपच सुंदर होते. तर हर्षलाने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. त्यानंतर गुलाबी रंगाचा शेला हातात होता. केसात गजरा, हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र असा साजशृंगार करून जयची नवरी नटली होती.
मार्च महिन्यात जयने मसुरी येथे निसर्गाच्या सानिध्यात गुडघ्यावर बसून हर्षला प्रपोज केले होते आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. साखरपुड्याला जय हर्षलाला रोमँटिक अंदाजात गुडघ्यावर बसून अंगठी घातली. ही दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करत होते. जय-हर्षलाचे लग्न त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबिय यांच्या उपस्थितीत पार पडले. आता जय दुधाणे आणि हर्षला पाटील यांच्यावर चाहते, मित्रमंडळी , कलाकार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जय दुधाणेने अनेक रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला आहे. तो 'बिग बॉस मराठी 3' मध्ये झळकला. तसेच जय दुधाणे Splitsvilla 13 चा विजेता देखील ठरला आहे. तर 'बिग बॉस मराठी 3' तो उपविजेता ठरला. तसेच त्याने 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम केले आहे. चाहते आता त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.जय दुधाणे हा कायम आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.