Abhijit bichukale Music Album Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhijit bichukale Music Album: व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिजीत बिचुकलेंचे चाहत्यांना गिफ्ट, रोमँटिक अंदाजमधील म्युझिक अल्बम भेटीला

Abhijit bichukale Song: अभिजीत बिचुकले हे प्रेम कवितांच्या म्युझिक अल्मबमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अल्बममध्ये अभिजीत बिचुकले हे प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Priya More

Abhijit bichukale:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस मराठी'मुळे (Bigg Boss Marathi) प्रसिद्धी मिळालेले साताऱ्याचे अभिजीत बिचुकले या नाही तर त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अभिजीत बिचकुले नवनवीन क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावतात. कधी राजकारणात, कधी मनोरंजनात तर कधी साहित्यिक होतात. आपल्या वादग्रस्त वक्तव्य, कधी कविता, तर कधी गाण्यांमुळे अभिजीत बिचकुले चर्चेत राहिले आहेत.

आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अभिजीत बिचकुलेंनी आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. ते प्रेम कविता असलेला म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या म्युझिक अल्बममध्ये स्वत: अभिजीत बिचकुले हे प्रियकराच्या भूमिकेत दिसत आहेत. सध्या त्याच्या या म्युझिक अल्बमचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आज हा म्युझिक अल्बम रिलीज होणार आहे. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत असून तो व्हायरल होत आहे.

अभिजीत बिचुकले हे प्रेम कवितांच्या म्युझिक अल्मबमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अल्बममध्ये अभिजीत बिचुकले हे प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिजीत बिचुकलेंचा स्टायलिश अंदाज आपल्याला या अल्बममध्ये पाहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये दिसत आहे की, अभिजीत बिचुकले काळ्या रंगाच्या आलिशान कारमधून उतरतात. त्यांचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. त्यानंतर ते त्यांच्या प्रेयसीसोबत रोमँटिक अंदाजमध्ये दिसतात. हे कपल कधी पळताना, कधी गप्पा मारताना, कधी डान्स करताना तर कधी बाइकवरून फिरताना दिसतात. 'करमत नाय...तिच्या विना...' असं नाव या म्युझिक अल्बमला दिल्याचे दिसत आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अभिजीत बिचुकलेचा हा म्युझिक अल्बम व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानेच रिलीज होणार आहे. या म्युझिक अल्बमची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, मागच्या वर्षी अभिजीत बिचुकले यांनी राजकारण, अभिनयानंतर संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिजीत बिचुकले यांचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपती बाप्पावर आधारित त्यांचे हे गाणं रिलीज झाले होते. या गाण्यामध्ये अभिजीत बिचकुले यांनी अॅक्टिंगसुद्धा केली होती. साताऱ्यातील राजलक्ष्मी टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या क्रांती गणेशोत्सव मंडळमध्ये या गाण्याचे शूटिंग करण्यात आले होते. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. या गाण्यानंतर आता अभिजीत बिचुकले यांचा म्युझिक अल्बम आज रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT