Bigg Boss Marathi 6 Winner SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Winner : "माझ्या हातात ही ट्रॉफी..."; 'बिग बॉस मराठी ६' ची विजेती तन्वी कोलतेची नवीन पोस्ट चर्चेत | VIDEO

BBM 6 Winner Tanvi Kolte Post : सध्या 'बिग बॉस मराठी ६' ची विजेती तन्वी कोलतेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. तन्वी कोलतेने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोस्टमध्ये नक्की काय म्हटले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी तन्वी कोलतेने उचलली.

तन्वी कोलते ही मूळची कोकणची आहे.

तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६' जिंकल्यानंतर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

कोकणची मुलगी तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६' ची विजेता ठरली. रितेश भाऊंनी तिला मानाची ट्रॉफी दिली. सध्या तन्वी कोलतेची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी ६' मुळे तन्वीला खूप लोकप्रियता मिळाली. घरात असताना तिचे प्रभू आणि राकेश बापटसोबत चांगले नाते जुळले. घरात तन्वी आपल्या खेळामुळे, विधानांमुळे , नात्यांमुळे चांगलीच चर्चेत राहिली. अशात तन्वी कोलतेने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तन्वी कोलते पोस्ट

"आज माझ्या हातात ही ट्रॉफी आहे...पण ही फक्त माझी नाही

ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची, प्रेमाची आणि आशीर्वादांची आहे...

या प्रवासात मी खूप काही शिकले...

कधी स्वतःवर विश्वास ठेवायला, कधी शांत राहून लढायला आणि कधी पडूनही पुन्हा उभं राहायला...

तुमच्यापैकी प्रत्येकाने मला दिलेलं प्रेम, प्रत्येक vote, प्रत्येक message…

मी सगळं मनापासून feel करतेय, अगदी रोज.

जेव्हा मी थकले... तुम्ही माझी ताकद बनलात

जेव्हा मी गोंधळले...तुम्ही माझा विश्वास बनलात

आणि आज तुम्ही माझा अभिमान आहात

तन्वी कोलते आज इथे उभी आहे,

कारण आपण सगळे कधीच हार मानली नाही...

ही फक्त जिंकण्याची गोष्ट नाही…

हा ठरला माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आपला प्रवास

त्या प्रत्येकाला जे माझ्यासारखी स्वप्न बघतात, त्यांना एकच सांगायचंय…

स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, आणि जिद्द दाखवा… वेळ आल्यावर जग तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल...

ही ट्रॉफी… आपल्या सगळ्यांची आहे

परत एकदा मनापासून धन्यवाद… कायम माझ्या सोबत असेच उभे रहा...."

तन्वी कोलतेच्या या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी कमेंट्स करताना दिसत आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राखी सावंत, पुष्कर जोग अशा अनेक कलाकारांनी तन्वीला पाठिंबा दिला आहे. आता चाहते तन्वीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT