Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुख पुन्हा घेऊन येतोय भाऊचा धक्का; 'बिग बॉस मराठी ६' अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 Host Riteish Deshmukh : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या पर्वाचे होस्टिंग महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ करणार आहे. रिलीज अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' च्या 'वीकेंड का वार' मध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आला.

रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी 6' चे होस्टिंग करणार आहे.

सलमान खानने रितेश देशमुखला 'बिग बॉस मराठी 6' साठी खूप शुभेच्छा दिल्या.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी' ची चर्चा पाहायला मिळत आहे. खूप वेळापासून 'बिग बॉस मराठी' च्या नवीन पर्वाचा होस्ट कोण असणार? ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र अखेर 'बिग बॉस मराठी 6' च्या होस्टबद्दल मोठा खुलासा झाला आहे. 'बिग बॉस मराठी 6'चे होस्टिंग दुसरा-तिसरा कोणी नाही तर महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख करणार आहे. 'बिग बॉस 19' च्या 'वीकेंड का वार' मध्ये रितेश देशमुख आला होता.

सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' मध्ये 'बिग बॉस मराठी 6' च्या होस्टची घोषण करण्यात आली. त्यामुळे चाहते आता 'बिग बॉस मराठी 6' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता आपल्याला शनिवार-रविवार 'भाऊचा धक्का' पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या चार सीझनचे होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केले होते. त्यानंतर 'बिग बॉस मराठी 5' चे होस्टिंग रितेश देशमुखने केले. पाचवा सीझन खूप गाजला. सर्वजण रितेशच्या होस्टिंगचे कौतुक करताना दिसले. त्यामुळे आता पुन्हा एकदा अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावायला रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी 6' घेऊन आला आहे.

सलमान खानने रितेश देशमुखला 'बिग बॉस मराठी 6' साठी खूप शुभेच्छा दिल्या. 'बिग बॉस मराठी 6' च्या शेअर केलेल्या टीझरवरून असा अंदाज लावला जात आहे की, या सीझनची थीम 'दरवाजा' संबंधित असणार आहे. या सीझनमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार कोणाचे नशिबाचे दार उघडणार, कोण होणार 'बिग बॉस मराठी 6' विजेता या सर्वांची आतापासूनच प्रेक्षकांना लागली आहे.

'बिग बॉस मराठी 6' कधी सुरू होणार?

'बिग बॉस हिंदी 19' चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी (7 डिसेंबरला) होणार आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस मराठी 6' डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा नवीन वर्षात जानेवारीच्या सुरुवातीला सुरू होईल. 'बिग बॉस मराठी' नवीन पर्व कलर्स मराठी आणि JioHotstarवर पाहायला मिळेल. मात्र अद्याप अधिकृतरित्या शोची रिलीज डेट जाहिर झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; हरहुन्नरी अभिनेता- दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

Suraj Chavan Video : हातावर किस अन् मांडीवर बसवलं...; सूरज चव्हाणचा बायकोसोबत रोमँटिक अंदाज

Maharashtra Live News Update: मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकात बैठक सुरू

Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याचा राग, बापाकडून गर्भवती मुलीची हत्या; नवरा अन् सासू-सासऱ्यांनाही सोडलं नाही

हा एक प्रीतीसंगम... वाजत-गाजत युतीची घोषणा होणार, संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची तारीखच सांगितली|VIDEO

SCROLL FOR NEXT