Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून 'तिचा' पत्ता कट्ट; 2 महिन्यात प्रवास संपला, धक्कादायक एलिमिनेशन

Bigg Boss Marathi 6 Elimination : बिग बॉसच्या घरातून सर्वात स्ट्राँग सदस्याचा पत्ता कट झाला. सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात आज ९व्या आठवड्याचे एलिमिनेशन पार पडणार आहे.

घरातील सर्वात स्ट्राँग सदस्य बाहेर पडणार आहे.

घरातील एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी 6' च्या (Bigg Boss Marathi 6) घरात राखी सावंतनंतर तीन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली. या आठवड्यात संकेत पाठक घराचा नवा कॅप्टन बनला आहे. ९व्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घरातून आलेली पत्रे पाहायला मिळाली. कुटुंबियांच्या पत्राने ठरवले की, कोण नॉमिनेट होणार आणि कोण सुरक्षित राहणार.

बिग बॉसच्या घरातून ९व्या आठवड्यात एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे-

  • संकेत पाठक

  • तन्वी कोलते

  • प्राजक्ता शुक्रे

  • दिपाली सय्यद

  • रेवा कौरासे

  • अनुश्री माने

आज भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ता शुक्रे घराचा निरोप घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिला सर्वात कमी मते मिळाल्यामुळे तिचा घरातील प्रवास येथेच थांबला आहे. संपूर्ण प्रवासात प्राजक्ताने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. ती गेले अनेक आठवडे सतत नॉमिनेट झाली होती. प्राजक्ता घरात वैयक्तिकरित्या गेम खेळताना दिसली. तिचे बिग बॉसच्या घरात करण सोनावणेसोबत चांगली नाते दिसले. प्राजक्ता शुक्रे 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली कॅप्टन झाली होती.

भाऊचा धक्का

आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख संकेत पाठक, राखी सावंत आणि राकेश यांची शाळा घेताना दिसणार आहे. मात्र अद्याप 'बिग बॉस मराठी 6'मधून आज भाऊच्या धक्क्यावर कोण घराचा निरोप घेणार हे अधिकृतरित्या जाहीर झाले नाही. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का खूपच गाजणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT