Bigg Boss Marathi 6 Ticket to Finale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: ‘टिकिट टू फिनाले’साठी तुफान राडा! सदस्यांमध्ये रंगणार काटे की टक्कर, पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi 6 Ticket to Finale: बिग बॉस मराठी ६ मध्ये ‘टिकिट टू फिनाले’ टास्क रंगणार आहे. यावेळी राकेश, तन्वी, अनुश्री आणि विशाल यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6 Ticket to Finale: 'बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. सागर कारंडेने नुकताच बिग बॉसचा निरोप घेतला आहे.आता राहिलेल्या स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्याची चुरस आणखी वाढली आहे. जसा बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले असून जवळ येत आहे तस फायनलपर्यंत थेट पोहोचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळणार आहे. यासाठी घरात 'तिकीट टू फिनाले'चा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये बाजी मारणारा सदस्य थेट बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचणार असून आता या टाक्सचा प्रोमो समोर आला आहे. 

'तिकीट टू फिनाले' या टास्कचा प्रोमो समोर आला असून, बिग बॉस सदस्यांना यामुळे मोठी संधी मिळणार आहे. ‘टिकिट टू फिनाले’ जिंकणारा सदस्य हा या सीझनचा पहिला फायनलिस्ट ठरणार असल्याने घरातील वातावरण अधिकच तापलं आहे. प्रत्येक जण या संधीसाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसणार आहे.

सध्या घरात तन्वी कोलते, राखी सावंत, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि राकेश बापट असे टॉप ७ स्पर्धक शिल्लक आहेत. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये सागर कारंडे बाहेर पडल्याने स्पर्धा आणखी कठीण झाली आहे. आता या सातपैकी कोण स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचणार आणि पुढे फायनलमध्ये स्थान मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ‘टिकिट टू फिनाले’ टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये तणाव वाढल्याचेही पाहायला मिळत आहे. याआधीच्या टास्कमध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार वाद झाला होता, जो हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या टास्कमध्येही तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन हे सध्या मजबूत दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे ‘टिकिट टू फिनाले’ टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि थेट फायनलमध्ये पोहोचणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकंदरीत, बिग बॉस मराठी ६ आता निर्णायक वळणावर आला असून प्रत्येक टास्कसोबत स्पर्धा अधिक रंगत चालली आहे. त्यामुळे येणारे भाग प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक ठरणार आहेत.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT