Bigg Boss Marathi 6 Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये संकेत पाठकची 'किंग-स्टाइल' एन्ट्री, काय असणार गेम प्लान?

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मध्ये संकेत पाठकची दमदार वाइल्डकार्ड एन्ट्री. हाय-बीट डान्स, रितेश देशमुखसमोर ठाम विधान आणि ‘किंग-स्टाइल’ कमेंटमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझन यावेळी विशेष चर्चेत आहे. यावेळी अभिनेता संकेत पाठकची वाइल्डकार्ड एन्ट्री झाली आहे. ही एन्ट्री फक्त फॉर्मल नव्हती, तर त्याच्या येण्याने आणि स्टेजवर हाय-बीट डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याने पहिल्याच क्षणापासून त्याने आपली वेगळी छाप पाडली. शांतपणे घरात जाण्याऐवजी एनर्जीने भरलेली सुरुवात करत संकेतने ‘मी आलोय’ हे स्पष्टपणे दाखवून दिलं.

होस्ट रितेश देशमुखशी संवाद साधताना संकेतने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. 'लोकांनी आतापर्यंत संकेत पाठकला सॉफ्ट, फ्रेश असा पाहिलं आहे. पण बिग बॉसच्या घरात त्यांना खरा संकेत पाहायला मिळेल,” असं तो म्हणाला.तसेच घरात जाण्यापूर्वी संकेतने सकारात्मक एनर्जी राखत मैत्री निर्माण करण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं होतं.

त्याच्या एन्ट्रीमुळे खूश होऊन बिग बॉसने स्वत:त्याच्या उपस्थितीचं कौतुक करत त्याची एन्ट्री ‘किंग-स्टाइल’ असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले, आणखी एक ओळखीचा चेहरा दिसेल बरं झालं.आणखी एकाने लिहिलं, रुचितापासून संभाळून राहा. तर एकाने लिहीले, नीट खेळ भावा

संकेतने ‘लाग्नाची बेडी’ आणि ‘छत्रीवाली’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली आहे. संयमी आणि भावनिक भूमिका साकारत त्याने आपली वेगळी छाप तयार केली आहे. मात्र बिग बॉसच्या घरात स्क्रिप्ट नसते त्यामुळे तो प्रेक्षकांंच्या मनातील त्याची जागा तशीच ठेवण्यात यशस्वी होणार का हे येत्या भागात पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना

पोलीस कॉन्स्टेबल 3 दिवसांपासून बेपत्ता, नंतर बस डेपोत मृतदेह; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: अमरावती विभाग शिक्षक आमदारकीसाठी काँग्रेसची ११ सदस्यीय निवडणूक समिती गठीत

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना न्यायालयाचा मोठा दिलासा! सर्व प्रकरणांतून दोषमुक्त, अखेरचा खटलाही रद्द

SCROLL FOR NEXT