Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

BB Marathi 6 - Ticket To Finale : बिग बॉसच्या घरात तुफान राडा झाला आहे. 'तिकीट टू फिनाले'साठी घरातील दोन सदस्यांमध्ये हाणामारी होते. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात नुकतेच डबल एलिमिनेशन पार पडले आहे.

घरात 'तिकीट टू फिनाले'साठी टास्क होतो.

बिग बॉसच्या घरात दोन सदस्य तुफान हाणामारी करताना दिसतात.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सध्या 12 आठवड्या सुरू झाला आहे. गेल्या आठड्यात बिग बॉसच्या घरातून दोन सदस्य बाहेर जातात. प्रभू शेकळे आणि संकेत पाठक बिग बॉसच्या घराचा निरोप घेतात. आता बिग बॉसचा गेम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचे कुटुंब त्यांना भेटायला आले होते. या आठवड्यातल तिकीट टू फिनालेची शर्यत पाहायला मिळणार आहे. नुकताच बिग बॉसने एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात घरात तुफान राडा पाहायला मिळत आहे.

नॉमिनेशन टास्क दरम्यान घरातील दोन सदस्यांमध्ये भांडणे होतात. दोघांमध्ये हाणामारीपर्यंत गोष्टी पोहचतात. नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील प्रत्येक सदस्याचा टिव्ही पाहायला मिळतो. ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचे असते, त्याचा टिव्ही फोडायचा असा टास्क असतो. ज्याचा टिव्ही फुटणार त्याचे फिनालेला जाण्याचे स्वप्न तुटणार असा खेळ होता.

घरात नेमकं काय घडलं?

नॉमिनेशमध्ये राकेश विशालचे नाव घेतो आणि विशालचा टिव्ही फोडतो. ज्यामुळे घरात तुफान राडा पाहायला मिळतो. राकेश बोलतो की, माझे नाव आहे विशाल. पर्सनल लाइफबद्दल बोलणे मला चुकीचे वाटते...तेव्हा विशाल खूप संतापतो आणि बोलतो की, "तू माझ्या एजबद्दल बोलतोस ते पर्सनल नाहीये का? " त्यानंतर पुन्हा रागात विशाल बोलतो, "तुझा डिव्होर्स काय झाला?" त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होता आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळते.

पुढे राकेश विशालवर संतापतो आणि बोलतो की, "डिव्होर्स का काढतोस?" त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण होते. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जातात. घरातील इतर सदस्य त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. सर्व गोंधळाचे वातावरण सुरू असताना बिग बॉस हस्तक्षेप करतात. तो कठोर शब्दात मोठ्याने आदेश देतात की, "राकेश आणि विशाल, लांब व्हा..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT