bigg boss marathi 6 Karan Sonawane Prajakta Shukre Love Angle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: करण पडला प्राजक्ताच्या प्रेमात? बिग बॉसने स्वत: दोघांची मस्करी करत केली पोलखोल

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरामध्ये सध्या सगळ्यांवर प्रेमाचा सुंदर रंग चढला आहे. घरातील स्पर्धक करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यातील लव्ह अँगलचा विषय चर्चेत आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरामध्ये सध्या सगळ्यांवर प्रेमाचा सुंदर रंग चढला आहे. या क्यूट लव्ह अँगलची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घरातील स्पर्धक करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यातील लव्ह अँगलचा विषय चर्चेत आहे. याच कारण म्हणजे घरात मोठा वाद झाला तेव्हा करणने राकेश बापटसमोर आमचं प्रेम असो, मैत्री असो किंवा काहीही असो इतर कुणीही यावर चर्चा करू नये असे ठाम मत मांडलं होतं.

या आठवड्यातील प्रोमोमध्ये घरातील कॅप्टन्सी टास्क दरम्यान सर्व सदस्यांना विविध फळांची चित्रं गळ्यात खूण म्हणून लावली गेली. प्राजक्ताच्या गळ्यात स्ट्रॉबेरीचे चित्र लावले गेले, तर करणने संत्र्याचं चित्र घेतलं. बिग बॉसनं या चित्रांची तुलना करत त्यांना चिडवलं व म्हणाले की “प्राजक्ताला स्ट्रॉबेरी शोभते… पण मी स्ट्रॉबेरीचे कौतुक केल्यावर संत्रे का लाजतंय?” यामुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे.

तसेच, नुकतेच दिलेल्या काही भागांत प्रेक्षकांनी करण आणि प्राजक्ताची जोडी काहीशी वेगळी किंवा रोमँटिक वाटते अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहीजण याला लव्ह अँगल म्हणत आहेत तर इतरांनी ही फक्त मैत्री आणि खेळाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

यादरम्यान, घरात रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यातही संवाद आणि त्यांच्यात सुरु असलेली कॅमेस्ट्रीवर देखील चर्चा सुरु आहे, यामुळे या सीझनमध्ये व्हेलेंटाइन डे निमित्त प्रेमाचे विविध रंग दिसत आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT