Suraj Chavan Meet Ajit Pawar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Meet Ajit Pawar: सूरज चव्हाण पुन्हा करणार झापुक झूपूक, अजित पवारांसमोरच केली घोषणा!

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Update : बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्याने त्याचा आगामी चित्रपट 'झापुक झूपूक' विषयी मोठी अपडेट दिली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi 5 Winner) विजेता सूरज चव्हाण झाला. आपल्या गेमने त्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली. सूरज चव्हाण (Suraj Chavan) जिंकावा अशी अवघ्या महाराष्ट्राची इच्छा होती. बिग बॉसच्या घरात आपल्या शांत आणि समजूतदार स्वभावाने त्याने सर्वांची मने जिंकली. बिग बॉसच्या घरात त्याची अनेकांशी चांगली नाती जोडली गेली.

सूरज चव्हाण- अजित पवार भेटी

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी सूरजचे नवीन घर ९ महिन्यात पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या आधी देखील सूरजने अजित पवार यांची भेट घेतली होती.

सूरज चव्हाण 'बिग बॉस'चा विजेता झाल्यावर अजित पवारांना भेटला होता. तेव्हा अजित पवारांनी सूरजला घर बांधून देणाचे आश्वासन दिले होते. अलिकडेच त्याच्या घराचे काम देखील सुरू झाले आहे. सूरज चव्हाण हा बारामतीतील मोढवे गावचा रहिवासी आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी रील स्टार आणि गायक होता. सूरज घर बांधून त्याला 'बिग बॉस'चं नाव देणार आहे. सूरजचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपुक' चित्रपट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमध्ये सूरज चव्हाण याने आपला आगामी चित्रपट 'झापुक झुपुक' ( Zapuk Zupuk) मोठी अपडेट दिली. त्याने सांगितले की, "'झापुक झुपुक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. " सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर केदार शिंदेंनी त्याला घेऊन 'झापुक झुपुक' सिनेमा काढणार अशी घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT