Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : माझा राया गं...; सूरज चव्हाणला बायकोनं दिलं खास सरप्राइज, रोमँटिक डान्सचा VIDEO चर्चेत

Suraj Chavan - Wife Sanjana Dance Video : 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाणला त्याच्या बायकोने एक भन्नाट सरप्राइज दिले आहे. दोघांनी मराठी गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे.

Shreya Maskar

सूरज चव्हाण लवकरच होणार बाबा

प्रेग्नेंट बायकोने लाडक्या नवऱ्याला दिले खास सरप्राइज

सूरज आणि संजनाने केला रोमँटिक डान्स

'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. अलिकडेच सूरजची बायको संजनाचे डोहाळे जेवण थाटामाटात पार पडले आहे. सूरज चव्हाणचे लव्ह मॅरेज आहे. त्याने आपल्या चुलत मामांची मुलीसोबत म्हणजेच संजनासोबत लग्नगाठ बांधली. गुलीगत किंग सूरज चव्हाण आणि संजना २९ नोव्हेंबर २०२५ लग्न बंधनात अडकले. त्याचा शाही विवाह सोहळा बारामतीत पार पडला.

संजनाचे सूरजसाठी खास पोस्ट

संजनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये संजना आणि सूरज रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. दोघांनी 'मेघ सावळा माझा राया...' या मराठी गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणे 'अगा बाई अरेच्चा!' या मराठी चित्रपटातील आहे. व्हिडीओला संजनाने खूप थोडक्यात पण लय भारी कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "माझा राया..."

व्हिडीओत संजना सूरजची नजर काढताना, त्याचे गाल ओढताना दिसत आहे. सूरजा सूरजसाठीचे प्रेम व्यक्त करत आहे. दोघे व्हिडीओत खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहे. संजनाने सुंदर साडी नेसली आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेगनेंसी ग्लो पाहायला मिळत आहे. मोकळे केस, सुंदर साज श्रृंगार आणि गळ्यात मंगळसूत्र घालून संजना सुंदर नटली आहे.

संजना- सूरजच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'छोटा गुलीगत येत आहे.', 'खूप शुभेच्छा.' ,'दोघे खूपच क्यूट दिसत आहे...' अशा कमेंट्स येत आहेत. बिग बॉसनंतर सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. सूरज चव्हाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या रीलने त्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे वैभववाडीतील हेत या गावी उभारणार स्मारक

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वेचं तिकीट महागणार

Reservation: 'हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारल्यास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही', सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Weight Loss Tips: वजन कमी करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, चालताना या 6 गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या

Heart blockage: ब्लड प्रेशर नॉर्मल असलं तरी हृदयात ब्लॉकेज असू शकतात? या 6 टेस्ट सांगतील हार्ट अटॅकचा धोका!

SCROLL FOR NEXT