Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : हमारा कॅप्टन कैसा हो...झापुक झुपुकवर सूरजने धरला ठेका

Bigg Boss Marathi Day 41 : 'बिग बॉस मराठी'चे नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. या नव्या पर्वात प्रत्येकजण प्लॅनिंग करण्यामागे लागले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) च्या सहाव्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कॅप्टनसी टास्कमध्ये सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य शेवटपर्यंत बसमध्ये टिकून राहिले होते. या चार सदस्यांमधून सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी' चा नवा कॅप्टन ठरला आहे.

'बिग बॉस मराठी' सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडला. या टास्कने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) झापुक झुपुकने सगळ्यांचे मन जिंकले आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकमुखाने आमचा कॅप्टन म्हणजे सूरज असं म्हणताना दिसत आहेत. सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी चांगलीच धमाल केली आहे. 'हमारा कॅप्टन कैसा हो सूरज जैसा हो' अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सर्व सदस्यांनी मिळून सूरजबरोबर 'झापुक झुपुक'बोलत डान्स देखील केला. सूरज कॅप्टन झाल्यामुळे बिग बॉसच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वजण सूरजचे अभिनंदन करत आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आतापर्यंत अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर कॅप्टन झाले आहेत. तर आता सहाव्या आठवड्यात सूरज चव्हाणला कॅप्टन पदाचा मान मिळाला आहे. कॅप्टन रूमचा ताबा घेण्याआधी सूरजने हात जोडून नमस्कार केलेला पाहायला मिळाला. कॅप्टन सूरजचं सध्या सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT