Riteish Deshmukh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: 'भाऊच्या धक्क्या'वर जाणवली रितेश भाऊची कमतरता; अवघ्या महाराष्ट्राने केलं लाडक्या भावाला मिस

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या ९व्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. परंतु या वीकेंडला व्यस्त चित्रीकरणामुळे रितेश भाऊला 'भाऊचा धक्का' करता आला नाही. दरम्यान चाहत्यांनी भाऊला मिस केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'चा लयभारी खेळ काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस मराठी' ५व्या सिझनचे सुत्रसंचालन करताना दिसत आहे. रितेश भाऊ आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवत आहे. 'भाऊच्या धक्क्या'वरील त्याच्या सादरीकरणाचं जगभरात भरभरून कौतुक होत आहे. पण या वीकेंडला मात्र व्यस्त चित्रीकरणामुळे त्याला 'भाऊचा धक्का' करता आला नाही. त्यामुळे रितेश भाऊची आठवण काढत हा भाऊचा धक्का पार पडला.

शनिवारी पार पडलेल्या 'महाराष्ट्राचा धक्का'ला महाराष्ट्रातील पत्रकारांनी तर रविवारी 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटातील कलाकार म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर, स्वप्निल जोशी आणि अभिनयसम्राट अशोक सराफ यांनी हजेरी लावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेलेल्या या सर्वच कलाकारांना रितेशची खूप आठवण आली.

रितेशने 'भाऊचा धक्का' एका वेगळ्या उंचीवर नेला आहे. दिवसेंदिवस तो हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजवत आहे. रेकॉर्ड्स ब्रेक करण्यासह महाराष्ट्रातील घराघरांतील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात रितेश भाऊ यशस्वी झाला आहे. 'बिग बॉस मराठी'ला रितेश भाऊने नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे.

रितेशमुळे यंदाचा सीझन खूप हटके ठरतोय. यंदाचा सीझनला अधिक टवटवीत करण्यात रितेशचा महत्त्वाचा हातभार लागत आहे. परिस्थितीनुसार रितेश भाऊ कधी कोणत्या सदस्याचा मित्र होतो तर कधी कोणाचा गुरू, कोणासोबत ग्रॅण्ड मस्ती करतो तर कोणासोबत लय भारी दोस्ती. घराील सदस्यांमधील कोणाचं काही चुकलं तर त्यांची शाळाही घेतो तर कोणाची पाठही थोपटतो, कधी शाबासकीही देतो. रितेश भाऊच्या या अनोख्या अंदाजाचं 'बिग बॉस' प्रेमी प्रशंसा करताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electrolyte Drink: मधुमेही रुग्णांसाठी इलेक्ट्रोल पावडर योग्य आहे का? जाणून घ्या फायदे-तोटे

Sunday Horoscope : भाग्याला कलाटणी मिळणार, जुन्या गोष्टींमधून फायदा होणार; रविवार ५ राशींच्या लोकांसाठी गेमचेंजर ठरणार

Shatataraka Nakshatra : शततारका नक्षत्रात जन्मलेले लोकअसतात हुशार, धाडसी, पैसा आणि अधिकार मिळवणारे

Success Story: खिशात फक्त १२०० रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे ३०० कोटींचा मालक

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

SCROLL FOR NEXT