Abhijeet Sawant SAAM TV
मनोरंजन बातम्या

वाह, भाई वाह! डोळ्यांवर गॉगल अन् सुटाबुटात Abhijeet Sawant चा स्वॅग न्यारा, भन्नाट डान्सचा VIDEO पाहा

Abhijeet Sawant Dance Video : 'अफगान जलेबी' या गाण्यावर बिग बॉस फेम गायक अभिजीत सावंतने भन्नाट डान्स केला आहे. जो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi 5) उपविजेता अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आपल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावतो. बिग बॉसमुळे अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या गेम आणि स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

अभिजीत सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या प्रोजेक्ट आणि आयुष्याबद्दल तो कायम अपडेट करत असतो. नुकताच अभिजीतने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जे पाहून चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अभिजीत 'अफगाण जलेबी' (Afghan Jalebi Song) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या स्वॅगने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये अभिजीत काळा गॉगल, काळा ब्लेझरमध्ये दिसत आहे. त्याने गळ्यामध्ये ज्वेलरी देखील घातली आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप जास्त आवडला आहे. अभिजीतने हा व्हिडीओ बाथरूममध्ये शूट केला आहे.

अभिजीतने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "शोच्या आधी उत्साह आणि बाथरूममध्ये आल्यावर उत्तम दिवे...तोह नाच गाना बंता है!" असे हटके कॅप्शन दिलं आहे.अभिजीतच्या या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. अभिजीत सावंत 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता देखील ठरला आहे. त्याच्या आवाजाने त्याने लोकांना वेड लावले आहे. बिग बॉसच्या घरातही तो सर्वांचा लाडका झाला. घरात निक्कीसोबत त्याची छान मैत्री पाहायला मिळाली. तसेच गेममध्ये त्याने सूरजला खूप पाठिंबा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT