Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: बिग बॉस संपलं, आता लग्न कधी करणार? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर अंकितानं थेट तारिखच सांगितली!

Ankita Walawalkar News: बिग बॉसच्या घरात अंकिताने तिच्या पर्सनल लाईफविषयी सांगितले होते. अंकिताने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ मुळे लाईमलाईटमध्ये राहिलेली 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेय. अंकिताने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांची मनें जिंकली. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना तिची खेळी आवडली.नुकताच बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा झाला. यामध्ये टॉप ६ मध्ये अंकिता होती. दरम्यान दुसऱ्या एलिमेशननंतर अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. सोशल मीडियावर अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी दिसली. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. बिग बॉसच्या घरात अंकिताने तिच्या पर्सनल लाईफविषयी सांगितले होते. अंकिताने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं.

कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक होती. ७० दिवसांच्या खेळानंतर नुकताच बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण ठरला. अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या टॉप ६ मध्ये होती.दरम्यान दुसऱ्या एलिमेशनमध्ये ती एलिमिनेट झाली. दरम्यान अंकिताने बिग बॉसच्या घरात तिच्या पर्सनल लाईफविषयी देखील भाष्य केलं होतं.अंकिताने बिग बॉस संपल्यानंतर लवकरच मी लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र ती कोणाशी लग्न करणार? हे स्पष्ट केले नव्हते.

अंकिता वालावलकरने बिग बॉसचा महाअंतिम सोहळा झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकिता वालावलकर घरातून बाहेर पडल्यानंतर नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने अंकिताला तुला नवरा कोण आहे. बिग बॉस झालं आता लग्न कधी करतेस असा प्रश्न विचारला आहे. ज्यावर अंकिताने १२ ऑक्टोबर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT