महाराष्ट्राचा लाकडा सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा 'झापुक झुपूक' (zapuk zupuk ) चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सूरज बिग बॉसमधील आपल्या मित्रांना भेटून त्याच्यासोबत भन्नाट गाण्यांवर रील बनवत आहे. सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता आहे. त्याला या शोमुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे. आता तो 'झापुक झुपूक' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
सूरज चव्हाणने अलिकडेच अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत भन्नाट डान्स केला आहे. त्यात आता नुकतीच सूरजने अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची भेट घेतली आहे. त्यांनी 'झापुक झुपूक' चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडीओ सूरजने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सूरज आणि जान्हवीने (Jahnavi Killekar ) 'झापुक झुपूक' चित्रपटातील 'वाजीव दादा' (Vajiv Dada ) गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
सूरजने या व्हिडीओला एक खास कॅप्शन देखील दिली आहे. त्याने लिहिलं की,"माझी लाडकी मैत्रीण जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत बिग बॉसच्या घरात कोंबडी पळाली वर लई जब्बर नाचलो होतो आणि तुम्ही आख्यांनी आम्हाला प्रेम दिलं तसंच आमच्या "वाजीव दादा" या हळदीच्या गाण्याला द्या... आज एकत्र नाचून लई जब्बर मज्जा आली…व्हू..! मॅक्सिमन...जान्हवी तू या पिक्चर साठी लई सपोर्ट केलास त्यासाठी खूप खूप गोलीगत प्रेम..."
सूरज आणि जान्हवीची डान्समधील तुफान एनर्जी अन् जबरदस्त स्टाइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. सूरज आणि जान्हवी 'वाजीव दादा' या गाण्याच्या हुक स्टेपवर बेफाम होऊन नाचले आहेत. चित्रपटात देखील या गाण्यावर बिग बॉसच्या मंडळींनी सूरजसोबत तुफान डान्स केला आहे. चाहते सूरजचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.