Bigg Boss Marathi canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात अरबाज आणि वर्षाताईंमध्ये जुंपली; भांडणामुळे सदस्य राहाणार उपाशी?

BigG Boss Marathi New Promo: बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये वर्षा ताई आणि अरबाजमध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहमीच काही न काही ट्विस्ट पाहायला मिळतात. बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या जंगल राज पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांना जेवणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजच्या भागामध्ये वर्षा ताई आणि अरबाजमध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे. परंतु, अरबाज आणि वर्षा यांच्यातील भांडणामुळे घरातील इतर सदस्यांना वेळेवर जेवण मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होतो.

बिग बॉस मराठीचा नविन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये डीपी दादा जोरजोरात भांडी वाजवत बिग बॉसला घरातील गॅस सुरु करण्यास सांगत आहे. त्यानंतर अंकिता गॅस सुरु करते आणि घड्याळ लावून घरातील इतर सदस्य जेवण बनवताना दिसत आहेत.

त्यानंतर अरबाज बिग बॉसना म्हणतो की, "बिग बॉस लवकर गॅस बंद करा." त्यापुढे वर्षाताई म्हणतात की, "उग्गाच राईचा पर्वत करायचाय" त्याला उत्तर देत अरबाज म्हणतो की, "गरम पाणी जाऊन तिथे फेकलं आहे" आणि त्यानंतर दोघांमध्ये जारदार भांडण पाहायला मिळणार आहे. 'प्राण्यांची सभा' या टास्कनंतर बिग बॉसने घरातील सदस्यांना घरातील गॅस वापरण्यासाठी ठरावीक कालाविधी दिला आहे. घरातील सदस्यांना बचत करता यावी आणि इंधनाची बचव व्हावी यासाठी हा टास्क करण्यात येत आहे. आठवडाभर घरातील सदस्यांना जेवणासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये डीपी दादा आणि अभिजितमध्ये संवाद होणार आहे. त्यादरम्यान डीपी दादा अभिजितला म्हणतो की, "तू कधी हत्ती आणि गेंड्याच्या अंगावर पट्टे पाहिले आहेत का?." त्यावर अभिजित म्हणतो की, " मी अंदाज बाधत होतो." त्याचवेळी बिग बॉस अभिजितला विचारतात तुम्ही वेज आहात की नॉनव्हेज? त्यानंतर जान्हवी म्हणते 'काकाकुवा' हा प्राणी मी कधीच विसरणार नाही.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT