Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : निक्कीला मारणं पडलं महागात, बिग बॉसने आर्याला थेट घराबाहेर काढलं; भावुक पोस्ट चर्चेत

Aarya Jadhao Elimination : आर्याने निक्कीच्या थोबाडीत मारल्यामुळे बिग बॉसने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काय झालं भाऊच्या धक्क्यावर जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सध्या खूप गाजत आहे. या आठवड्यात खूप राडा पाहायला मिळाला आहे. अरबाज-संग्राम, निक्की-जान्हवी आणि सर्वात मोठ म्हणजे निक्की- आर्या असे अनेक वाद या आठवड्यात झाले आहेत. कॅप्टन्सी टास्क हा वादाचा मुख्य कारण ठरला. कॅप्टन्सी टास्कच्या झटापट आर्याने (Aarya Jadhao) निक्कीला कानाखाली मारली आणि सर्व बाजूच पलटली. यामुळे बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं तर भाऊच्या धक्क्यावरही आर्याला खूप सुनावले आणि बिग बॉसच्या घरातून बाहेरची वाट दाखवली आहे.

आर्या भाऊ खडेबोल सुनावताना म्हणतात की, तुम्ही स्वतःला काय समजता? राग आला तर कोणावरही हात उचलणार? स्वतःवर नियंत्रण नाही? या घरात अनेक वेळा धक्काबुक्की झाली पण कोणीही स्वतःवरचा ताबा सोडला नाही. कोणीही कोणावर हात उचलला नाही. तुम्ही जे केलं ते जाणीवपूर्वक केले. असे बोलून रितेश भाऊ आपली सर्व सूत्र बिग बॉसच्या हातात देतो.

बिग बॉस घराबाहेर आल्यानंतर आर्या जाधवने इन्स्टाग्राम ब्रोकन हार्ट इमोजीची पोस्ट केली त्यावर अनेक कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या आठवड्यात आर्याला बिग बॉस घरातून काढून टाकण्यात आले आहे. बिग बॉस घरातून बाहेर येताच तिने केलेल्या पोस्टवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट्स पाहायला मिळत आहेत. बिग बॉसचा हा निर्णय चाहत्यांना पटला नाही आहे. त्यांनी याबाबत विरोध दर्शवला आहे. तसचे आर्याला खूप पाठिंबा मिळत आहे. निक्कीच्या (Nikki Tamboli) वागण्यामुळे प्रेक्षक तसेही वैतागले होते. त्यामुळे आर्याने जे केल ते बरोबर आहे, असे त्यांचे मत आहे.

आर्याच्या खेळाबाबत अनेक कमेंट्स चाहते करत आहे. कोण म्हणत की, तुझा खेळ आम्हाला खूप आवडत होता, आताही तुझ्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. तसेच आर्याला एका चाहत्यांने वाघीण अशी उपमा देखील दिली आहे. बिग बॉसचा हा निर्णय पटला नसल्यामुळे संतपत चाहत्यांनी बॉस बघणं बंद…च्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच आर्याने निक्कीला मारलं हा व्हिडीओ ऑनएअर दाखवला नाही याबाबतही चाहते नाराज होते. मात्र यावर भाऊचा धक्क्यावर रितेशने उत्तर दिले की, "हा शो मुलं पाहतात त्यामुळे हिंसा दाखवू शकत नाही." आता या सर्वावर बिग बॉस पुढे काय करणार तसेच चाहते काय करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT