Marathi Bigg Boss Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi Season 4: 'बिग बॉस'मध्ये अवतरणारी 'ती' अप्सरा कोण? बाथटबमधील बोल्ड डान्सने प्रेक्षक घायाळ

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बिग बॉस मराठी ४ हे पर्व चांगलेच चर्चेत आहे. मराठी टीव्हीवरील सर्वात भव्य रिअॅलिटी शो (Reality Show) म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिलं जातं. येत्या रविवारी म्हणजे २ ऑक्टोबर, २०२२ ला बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच स्पर्धकांची नवे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच बिग बॉसच्या पहिल्या दोन स्पर्धाकांची झलक समोर आली आहे.

कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या प्रीमिअरचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओतील तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहेत. त्यातील एकीने तर चक्क बाथटबमध्ये डान्स केला आहे. कलर्स मराठीने व्हिडीओ शेअर करत "तीची अदा बघून सगळेचं होणार फिदा🔥 BIGG BOSS मराठीच्या मंचावर अवतरणार ही अप्सरा... सांगा आहे तरी कोण?" असे कॅप्शन पहिल्या व्हिडिओला दिले आहे. "मंचावर रंगणार दिलखेचक अदाकारी 🔥कोण असतील हे स्पर्धक?" असे कॅप्शन देत कलर्सने मराठीने दुसरा व्हिडीओ शेअर केला आहे.

युजरनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. परंतु कमेंटद्वारे मराठी प्रेक्षक या शोवर टीका करत आहेत. अनेकांनी मराठी गाणं न वापरल्याने आक्षेप नोंदवला आहे. 'दिलखेचक नाही दिलटोचक वाटतेय अदाकारी' अशी कमेंट एका युजरने केली आहे. 'महाराष्ट्राची संस्कृती ही अशी आहे का?', अशा आशयाच्या कमेंट ह्या व्हिडिओवर केल्या जात आहेत. बिग बॉस हा शो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो. या पर्वाची सुरुवात देखील तशीच होत आहे. बिग बॉस मराठी ४ मध्ये अजून काय काय पाहायला मिळणार आणि प्रेक्षक त्यासगळ्याकडे कसे बघतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उमेदवारांचा प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात

'ऐश्वर्या राय मला लग्नाचा प्रस्ताव पाठवेल, मी तिचं मुस्लिम नाव..'; पाकिस्तानचा धर्मगुरू बरळला | VIDEO

Panvel-Karjat Railway: पनवेल- कर्जत प्रवास फक्त ३० मिनिटात, कधी सुरू होणार मार्ग, वाचा संपूर्ण A टू Z माहिती

Winter Health Care : हिवाळ्यात प्या हे ५ पौष्टिक आणि हेल्दी सूप

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी आणि कलश स्थापना कशी करावी?

SCROLL FOR NEXT